भोकरदन येथे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उडवले; एकजण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:39 PM2018-02-21T12:39:05+5:302018-02-21T13:42:43+5:30

१२ वीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे

Truck carried students to be examined at Bhokardan; One died on the spot and two seriously injured | भोकरदन येथे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उडवले; एकजण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी

भोकरदन येथे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उडवले; एकजण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी

Next

भोकरदन ( जालना ): १२ वीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जालना रोडवर ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे. सकाळी १० च्या दरम्यान झालेल्या या अपघातात इतर दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, तडेगाव वडी येथे राहणारे करण कलुसिंग घुनावत व अनिल केसरसिंग घुनावत हे दोघे रामेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. दोघांचेही १२ वीच्या परीक्षेसाठी भोकरदन येथे केंद्र आले होते. आज पहिलाच पेपर असल्याने ते दोघेही परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचण्यासाठी सुनील रूपसिंग घुनावत याच्या दुचाकीवर ( क्रमांक एम एच 21 ए एक्स 9392 ) जात होते. याच दरम्यान शहराजवळील जालना रोडवर असलेल्या कृषी कार्यालयासमोर ते येताच विरुद्ध दिशेने भोकरदन कडून जालन्याकडे जाणाऱ्या ट्रक ( जीजे 18 ऐक्स 1977 ) ने त्यांना समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात सुनीलच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच  करण व अनिल हे गंभीर जखमी आहेत. त्या दोघांनाही अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Truck carried students to be examined at Bhokardan; One died on the spot and two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.