डिघेला मारहाण करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:29 AM2018-11-19T00:29:10+5:302018-11-19T00:29:43+5:30

बदनापूर तालुक्यातील चितोडा येथील राष्ट्रवादी कॉग्रेंसचे कार्यकर्ते भीमराव डिघे यांना मारहाण करणा-या तीन आरोंपींना पोलिसांनी शनिवारी रात्री शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन अटक केली

The three of the beaten assailants were shocked | डिघेला मारहाण करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

डिघेला मारहाण करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बदनापूर तालुक्यातील चितोडा येथील राष्ट्रवादी कॉग्रेंसचे कार्यकर्ते भीमराव डिघे यांना मारहाण करणा-या तीन आरोंपींना पोलिसांनी शनिवारी रात्री शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन अटक केली. भीमराव डिघेला मारहाण केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कृष्णा दौलतराव सलामपूरे (३०) भरत चतुरसिंग तिलवरवाले (२८) (दोघे रा. ढवळेश्वर), अर्जुन उर्फ राजू नामदेव कापसे (रा. तांदूळवाडी) यांचा समावेश आहे.
रविवारी तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी यांचे सोशल मीडियाचे डिघे काम पाहतात. भाजपाचे आ. नारायण कुचे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याचा कारणावरुन भीमराव यादवराव डिघे यांना १२ नोव्हेंबर रोजी राजूर रस्त्यावर तिघांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात चांगलेच राजकारण तापले आहे.
शनिवारी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जखमी भीमराव डिघे यांची भेट घेऊन विचारपूस केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री तिन्ही आरोपींना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन अटक केली. रविवारी तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या वादामुळे बराच राजकीय गोंधळ उडाला होता. या पकडलेल्या आरोपींकडून अधिक माहिती पोलीस काढणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The three of the beaten assailants were shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.