अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:57 AM2019-07-11T00:57:05+5:302019-07-11T00:57:23+5:30

अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

Stop the way for Anganwadi workers | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
शासनाने मानधन वाढ केली असली तरी ती अद्याप मिळालेली नाही. शासनाने पेन्शन योजनेचे आश्वासन दिले. मात्र, त्याची पूर्तता झालेली नाही. इंधन बिल, प्रवास भत्ता मिळत नाही, अंगणवाड्यांसाठी इमारत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. शासनाच्या आॅनलाईन निर्णयामुळे जुन्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामकाजातही अडचणी वाढल्या असून, त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यासह इतर सर्व प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी बुधवारी हा मोर्चा काढण्यात आला. रास्ता रोकोनंतर शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोेंढे यांच्याशी चर्चा केली. या मोर्चात अण्णा सावंत, डॉ.सुनंदा तिडके, मधुकर मोकळे, कांता मिटकरी, साजिद बेगम, मंगल नरंगळे, राहीताई वाघ, मधुरा रत्नपारखे, मंदा शेळके, शुभांगी कुलकर्णी, दगडताई पितळे, उषाताई तंगे, संगीत वायखिंडे, मीराताई बोराडे, द्वारका घोडके यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Web Title: Stop the way for Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.