एडीएसकडून आठ लाखाचे स्पेअर पार्ट्स जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:30 AM2018-12-09T00:30:18+5:302018-12-09T00:30:38+5:30

एडीएसच्या पथकाकडून जालन्यात मोटारसायकलींचे आठ लाख रूपयांचे स्पेअर्स पार्ट्स विक्रीच्या हेतूने आणलेल्या एका व्यक्तीला अटक केली

Spare parts worth Rs. 8 Lakhs seized | एडीएसकडून आठ लाखाचे स्पेअर पार्ट्स जप्त

एडीएसकडून आठ लाखाचे स्पेअर पार्ट्स जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील एडीएसच्या पथकाकडून जालन्यात मोटारसायकलींचे आठ लाख रूपयांचे स्पेअर्स पार्ट्स विक्रीच्या हेतूने आणलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आल्याची माहिती एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी दिली.
जालना शहर व परिसरात एक व्यक्ती वेगवेगळ्या मोटार सायकलींचे स्पेअर्स पार्टस् विक्रीसाठी ग्राहकांचा शोध घेत असल्याची माहिती यशवंत जाधव यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यांनी लगेचच खात्री करण्यासाठी सापळा लावला. यावेळी एडीएसच्या पथकाने लोधी भागातील त्यांच्या घराची झडती घेतली असता, घरातून ८ लाख ८७ हजार १९३ रूपयांचे स्पेअर्स पार्ट्स जप्त केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे जाधव म्हणाले. ही कारवाई एडीएसच्या पथकातील ज्ञानदेव नागरे, एम. जी. स्कॉट, नंदू खंदारे, किरण चव्हाण, नंदकिशोर कामे, आकाश पुरी, गजानन भोसले यांनी केली.

Web Title: Spare parts worth Rs. 8 Lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.