वडीगोद्रीत पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 01:00 AM2018-07-15T01:00:28+5:302018-07-15T01:00:43+5:30

अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला असून, त्याने एका शेळीचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

Repeat | वडीगोद्रीत पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ

वडीगोद्रीत पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला असून, त्याने एका शेळीचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
काही दिवसापूर्वी वडीगोद्री शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आता पुन्हा हा बिबट्या परिसरात आढळून आला असून, त्यांने येथील गट क्रमांक ८७ मधील डॉ. राजेंद्र गावडे यांच्या शेळीवर हल्ला करत शेळी घेऊन गेला. जनावरांचा ओरडण्याचा आवाज ऐकताच सालगड्याने उठून बघितल ेअसता, तेथे शेळी आढळून आली नाही. परिणामी, येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Repeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.