नगराध्यक्षपद पुन्हा महिलेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:59 AM2018-05-24T00:59:20+5:302018-05-24T00:59:20+5:30

जाफराबाद येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता दीपक वाकडे यांची तर उपनगराध्यक्षपदी अहमद शेख यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली.

Referendum | नगराध्यक्षपद पुन्हा महिलेकडे

नगराध्यक्षपद पुन्हा महिलेकडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता दीपक वाकडे यांची तर उपनगराध्यक्षपदी अहमद शेख यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. निकालाची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचितांचे माजी आ. चंद्रकांत दानवे, तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण यांनी स्वागत केले.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकी साठी पिठासीन अधिकारी हरीचंद्र गवळी यांच्या उपस्थितीत नगरपंचायत कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार जे. डी. वळवी, मुख्याधिकारी विद्या कदम यांची सभागृहात उपस्थिती होती.
निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. निवडणुकी दरम्यान भारतीय जनता पार्र्टीने उमेदवारांना वेगवेगळे अमिष दाखवून पक्षात फूट पडण्याचा प्रयत्न केला. तसेच भाजपच्या नगरसेवकांनी अनेक वेळा ना हाराकत प्रमाण पत्र देऊन सुद्धा विकास कामांमध्ये अडथळे अणण्याचा प्रयत्न केला सुधाकर दानवे व माजी आ.चंद्रकांत दानवे यांनी पत्रपरिषेदेत केला. भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे यांच्यावरही पत्रकार परिषदेत आरोप करण्यात आला. तसेच सवार्ना सोबत घेऊन जातीपातीचे राजकारण न विकासाचे विकासाचे करणार असल्याची ग्वाही या वेळी देण्यात आली.

Web Title: Referendum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.