भ्याड हल्ल्याचा जालना जिल्ह्यात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:18 AM2019-02-16T00:18:47+5:302019-02-16T00:19:15+5:30

सिंधी बाजार येथील स्वांतत्र्य वीर सावरकर चौक येथे कश्मीर पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या आतंकी भ्याड हल्याचा तीव्र निषेध करत जैश ए मोहम्मद चा सरगना मसुद अझहरचा पुतळा आणि पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.

Prank protest in district Jalna | भ्याड हल्ल्याचा जालना जिल्ह्यात निषेध

भ्याड हल्ल्याचा जालना जिल्ह्यात निषेध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सिंधी बाजार येथील स्वांतत्र्य वीर सावरकर चौक येथे कश्मीर पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या आतंकी भ्याड हल्याचा तीव्र निषेध करत जैश ए मोहम्मद चा सरगना मसुद अझहरचा पुतळा आणि पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.
पुतळ्याला सतंप्त नागरीकांनी चप्पलाचा हार टाकून जोडे मारले. तसेच पाकिस्तान देशा विरोधात पाकिस्तान मुर्दाबादची घोषणा केली. या हल्यात शहीद झालेल्या वीर जवांनाना भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे, जय हिंंद जय हिंद की सेना अशी घोषणा देत श्रद्धांजली अर्पन करण्यात आली.
यावेळी चंपालाल भगत, भरत सांबरे, घनश्याम खाकीवाले, प्रशांत जैस्वाल, आकाश टेकुर, देवेन टेपन, संतोष भगत, अविनाश भगत, राजु परेवा, रतन गोमतीवाले, मुजाहीद, सय्यद आसिफ,शेख अफसर, पाल्या कुरील, गोरु गोमतीवाले, शेख नजीर व इतर नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातही शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. एकूच पाकीस्तानचा निषेध नोंदविण्यात आला.
शहर काँग्रेसचा जालन्यात कॅन्डल मार्च
जालना : पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा जालना शहर काँग्रेस समितीच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येऊन शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली . यावेळी मामा चौकामध्ये कॅन्डल मार्चचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले होते.
याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, प्रदेश सचिव विजय कामड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव पायगव्हाणे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे, बदर चाऊस, शितल तनपूरे, सुषमा पायगव्हाणे, देवराज डोंगरे, आरेफ खान, फकीरा वाघ, शमीम कुरेशी, राजेंद्र वाघमारे, राजेश ओ. राऊत, निलेश दळे, सिताराम अग्रवाल, मनोज गुढेकर, चाऊस, गरंडवाल, गोरख खरात आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय एकात्मता कृती समिती
जालना : राष्ट्रीय एकात्मका कृती समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी गांधी चमन चौक येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी माजी आ. अरविंद चव्हाण, इकबाल पाशा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, कॉ. सगीर अहेमद रजवी, रावसाहेब ढवळे, मुरली काकड, संजय देठे, विजय पवार, आमेर पाशा, घवेंदे, देहेडकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Prank protest in district Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.