अर्धवट पुरलेले जिवंत अर्भक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:18 PM2017-11-19T23:18:18+5:302017-11-19T23:18:33+5:30

तालुक्यातील श्रीधर जवळा येथे पुरूष जातीचे अर्भक अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळून आले. रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला.

Partially buried alive infant | अर्धवट पुरलेले जिवंत अर्भक

अर्धवट पुरलेले जिवंत अर्भक

googlenewsNext

परतूर : तालुक्यातील श्रीधर जवळा येथे पुरूष जातीचे अर्भक अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळून आले. रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला.
श्रीधर जवळा येथील दौलतराव खरात यांच्या शेतात ऊसतोड करणा-या मजुरांना दुपारी लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. काही महिला आवाजाच्या दिशेन गेल्या असता, त्यांना मातीने भरलेले अर्धवट पुरलेल्या स्थितीत पुरुष जातीचे अर्भक आढळून आले. याबाबत सरपंच वसंतराव राजबिंडे यांना माहिती देण्यात आली. राजबिंंडे यांनी पोलिसांना कळविले. उपनिरीक्षक विजय जाधव, कॉन्स्टेबल कांबळे, शाम गायके, महिला कर्मचारी केदारे हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अर्भकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी प्रशांत अंभुरे यांनी उपचार करून बाळ ठणठणीत असल्याचे सांगितले. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------
म्हणून वाचला जीव
शेतात सापडलेले अर्भक पुरून टाकण्यासाठीच आणले असावे. मात्र, खड्डा खोदत असताना कुणीतरी आल्याची चाहूल लागल्याने आपला भांडाफोड होईल, म्हणून संशयितांनी अर्धवट पुरलेले अर्भक सोडून पळ काढला. त्यामुळे या बालकाचा जीव वाचला, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

Web Title: Partially buried alive infant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.