अपघातात ठार झालेल्या मयताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:42 AM2018-11-23T00:42:08+5:302018-11-23T00:42:39+5:30

दुचाकी आणि जीप यांच्या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ३१ लाख ७९ हजार १७१ रूपयांची भरपाई देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकताच विमा कंपनीस दिला आहे.

Order to compensate the dead relatives of the deceased in the accident | अपघातात ठार झालेल्या मयताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

अपघातात ठार झालेल्या मयताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुचाकी आणि जीप यांच्या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ३१ लाख ७९ हजार १७१ रूपयांची भरपाई देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकताच विमा कंपनीस दिला आहे.
शेख नजीर शेख जब्बार हे एका कंपनीत ज्युनिअर टेक्निशियन म्हणून काम करित होते. २५ आॅक्टोबर २०१५ रोजी ते दुचाकी क्र. एम.एच. २०, डी.एम. ३१७८ वरून जालन्याकडे येत होते. दरम्यान देमीनी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जीप. क्र. १२ जे. सी- २६५२ ने जोराची धडक दिली.
यात शेख यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने
जीप मालक, चालक व विमा कंपनीस गैर अर्जदार ठरवून मयताच्या वारसांना ३१ लाख ७१ हजार १७१ रूपये अर्ज दाखल केलेल्या तारखेपासून ७.५ टक्के व्याजदराने द्यावे, असे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एम. मिश्रा यांनी दिला आहे.
अर्जदाराच्या बाजूने अ‍ॅड. ए. झेड बियाबाणी आणि अ‍ॅड. आर. एन. तायडे यांनी काम पाहिले.

Web Title: Order to compensate the dead relatives of the deceased in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.