उत्पादनाच्या विकेंद्रीकरणातच स्वयंरोजगाराच्या संधी तयार होतात- देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:32 AM2019-02-11T00:32:49+5:302019-02-11T00:33:30+5:30

उत्पादनाच्या केंद्रीकरणातून विषमता व बेरोजगारी निर्माण होते. त्यासाठी उत्पादनाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रेरणा देसाई यांनी केले.

Opportunities for self-employment are created in the decentralization of production- Desai | उत्पादनाच्या विकेंद्रीकरणातच स्वयंरोजगाराच्या संधी तयार होतात- देसाई

उत्पादनाच्या विकेंद्रीकरणातच स्वयंरोजगाराच्या संधी तयार होतात- देसाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उत्पादनाच्या केंद्रीकरणातून विषमता व बेरोजगारी निर्माण होते. त्यासाठी उत्पादनाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रेरणा देसाई यांनी केले.
येथील जेईएस महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित १५ व्या राज्यस्तरीय गांधीविचार अभ्यास शिबिरात स्वावलंबन आणि स्वयंरोजगार या विषयावर ‘त्या’ बोलत होत्या.
पुढे बोलताना ‘त्या’ म्हणाल्या की, स्वयंरोजगारातून बनवलेल्या वस्तू सर्वांनी वापराव्या, जेणेकरून अनेकांना रोजगार मिळेल आणि संपत्तीचे केंद्रीकरण होणार नाही, विषमताही निर्माण होणार नाही. आज पन्नास टक्केपेक्षा अधिक संपत्ती काही निवडक लोकांच्या हातात आहे आणि त्याची वृद्धी काही पटीत होताना दिसते. यामुळे गरिबी, बेरोजगारीसारख्या समस्या वाढत आहे. आजची शिक्षण व्यवस्था तरुणांना निरुद्योगी व परावलंबी करणारी आहे, ज्यामुळे बेकारीचा प्रश्न समाजात निर्माण झाला आहे. त्यासाठी तरुणांनी स्वावलंबनातून स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या नव्या समाजव्यवस्थेसाठी प्रयत्न करावेत. तरुणांनी समाज माध्यमांद्वारे विकास, प्रगती यांचे वरवरचे अर्थ समजून घेण्यापेक्षा वर्तमानपत्र व संदर्भ ग्रंथांच्या माध्यमातून ते नीट समजून घेतले पाहिजे.
आपला विकास साध्य करताना आपल्या हातातून जाणाºया पैशाचा प्रवास विचारात घ्यावा. ज्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.
भौतिक सुखामुळे माणूस आत्ममग्न होतो व नव्या स्मार्ट जगण्याच्या कल्पनांना बळी पडतो. त्यासाठी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा महात्मा गांधींचा मंत्र आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

Web Title: Opportunities for self-employment are created in the decentralization of production- Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.