वाणिज्य विभागातील संधीमुळे ओढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:59 AM2018-06-27T00:59:51+5:302018-06-27T01:00:25+5:30

शहरातील काही प्रमुख महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील प्रवेशाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वात जास्त वाणिज्य शाखेसाठी विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच बँकींग आणि वित्तीय क्षेत्रातील संधी या युवकांना आकर्षित करत असल्याचे यावरून दिसून येते.

Opportunities in the Commerce Department remain lax | वाणिज्य विभागातील संधीमुळे ओढा कायम

वाणिज्य विभागातील संधीमुळे ओढा कायम

Next

चैताली पालकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील काही प्रमुख महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील प्रवेशाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वात जास्त वाणिज्य शाखेसाठी विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच बँकींग आणि वित्तीय क्षेत्रातील संधी या युवकांना आकर्षित करत असल्याचे यावरून दिसून येते.
येथील जेईएस महाविद्यालयात प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्याकडे वाणिज्य विभागाच्या तीन तुकड्या आहेत. त्यात आतापर्यंत जवळपास ४८५ जणांनी रजिस्ट्रेशन केले आहे. त्या तुलनेने विज्ञान आणि आर्टस शाखेत पूर्वी एवढे विद्यार्थी येत नसल्याचे त्यांनी सांगितले. वाणिज्य विषयात पदवी अथवा बारावी उत्तीर्ण झाल्यावर सीए. कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाऊंटंट, तसेच कसल्लागर यासह बँकांमध्ये मोठी संधी असल्याचे सांगण्यात आले. येथील मत्स्योदरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.आर. गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी देखील यंदा वाणिज्य विषयाची नोंदणी सर्वात जास्त झाल्याचे सांगितले.
राष्ट्रमाता महाविद्यालयात मात्र, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स आणि क्रॉप सायन्स या दोन विषयांना प्रॅक्टीकलचे गुण मिळत असल्याने येथे अ‍ॅडमिशनसाठी रांगा लागल्याचे चित्र होते.
दहावीची मूळ गुणपत्रिका आणि टीसी मिळाल्यानंतर आता आयटीआयमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. नोंदणी केल्यावर लगेचच अर्जांची छाननी प्रक्रिया येथे सुरू असल्याची माहिती प्राचार्य देविदास राठोड यांनी सांगितले.

Web Title: Opportunities in the Commerce Department remain lax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.