मंदिर हाच आत्मकल्याणाचा एकमेव मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:49 AM2019-05-12T00:49:14+5:302019-05-12T00:49:28+5:30

मंदिर हाच आपल्या आत्मकल्याणाचा एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

This is the only way of self-actualization of the temple | मंदिर हाच आत्मकल्याणाचा एकमेव मार्ग

मंदिर हाच आत्मकल्याणाचा एकमेव मार्ग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बालाजी मंदिर संस्थानने प्रसादालय उभारण्याचा हाती घेतलेला संकल्प हा ऐतिहासिक क्षण आहे. कष्ट आणि संयमातून कोणत्याही चांगल्या गोष्टीला आकार येत असतो, आणि हिंदू संस्कृतीला सर्वश्रेष्ठ संस्कृती मानले गेले आहे. त्याचे कारण देखील हेच आहे. म्हणूनच मंदिर हाच आपल्या आत्मकल्याणाचा एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
जुना जालना भागातील कचेरी रोडवरील बालाजी मंदिरात भक्तांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या प्रसादालयाचे भूमिपूजन जाफराबाद येथील नवनाथ संस्थानचे प. पू. भास्करराव महाराज देशपांडे (भाऊ) यांच्या हस्ते आणि ब्रह्मवृंदांसह मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी वे.शा.सं. शेष महाराज गोंदीकर, प. पू. रामदास महाराज आचार्य, ह.भ.प. नाना महाराज पोखरीकर, ह.भ.प. प्राचार्य दीनानंद महाराज पाठक, प. पू. विवेक महाराज जोगवडकर, वे. शा. सं. रवि महाराज जहागीरदार, वे. शा. सं. विनायक महाराज फुलंब्रीकर यांच्यासह माजी आ. अरविंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी नगराध्यक्ष विलास नाईक, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याण देशपांडे, दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुधाकर लोखंडे, प्रा. एस. व्ही. देशपांडे, किरण गरड, अ‍ॅड. बलवंत नाईक, गुजराती समाजाचे अध्यक्ष अमित कसारी, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले, गणेश सुपारकर, चंद्रप्रकाश शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खोतकर म्हणाले की, या संस्थानच्या विश्वस्तांनी अत्यंत कष्ट आणि संयमातून या मंदिराची उभारणी केल्यानंतर प्रसादालयाचे काम देखील हाती घेतले आहे. या संस्थानकडून खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य होत असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देशपांडे यांनी केले.
भास्कर महाराज यांचे मार्गदर्शन
या प्रसंगी प. पू. भास्कर महाराज देशपांडे म्हणाले की, देणाºयाचे हात हजारो, दुबळी माझी झोळी ! या कार्याला देखील आपण स्वत: शक्य ती मदत करणार असून, प्रत्येकानेच ती केली तर प्रसादलयाचे कार्य सिध्दीस जाईल असे ते म्हणाले.
जिथे अन्नपूर्णा वास करते त्या ठिकाणी देणाऱ्यांची उणीव भासत नाही. या सत्कार्याला निश्चितच सर्वांचेच सहकार्य लाभेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: This is the only way of self-actualization of the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.