मोदींचे ‘जुमले’ आता चालणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:46 AM2019-01-11T00:46:47+5:302019-01-11T00:47:27+5:30

गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी देशोतील नागरिकांना चुनावी जुमले च्या माध्यमातून आर्षित करून अनेक खोटी स्वप्ने दाखवलिी होती. आगामी निवडणुकीत जनता त्यांच्या भूल-थापांना बळी पडणार नाही, असे मत केशवचंद यादव यांनी व्यक्त केले.

 Modi's 'accumulated' will not work | मोदींचे ‘जुमले’ आता चालणार नाहीत

मोदींचे ‘जुमले’ आता चालणार नाहीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी देशोतील नागरिकांना चुनावी जुमले च्या माध्यमातून आर्षित करून अनेक खोटी स्वप्ने दाखवलिी होती. मात्र, नागरिकांना आता सर्व काही कळून चुकले असून, आगामी निवडणुकीत जनता त्यांच्या भूल-थापांना बळी पडणार नाही, असे मत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली युवा क्रांती यात्रा गुरूवारी जालन्यात आली होती. त्यावेळी या याात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी या युवा क्रांती यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष विचारांची आज देशाला कशी गरज आहे, हे पटवून दिले जात आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर कसे अपयशी ठरले आहे, याची माहिती जनसामान्यांना दिली जात असल्याचे यादव यांनी सांगिले. या यात्रेस संपूर्ण देभर मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी केशवचंद यादव यांचे अंबड चौफुलीजवळ जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीनिवास, महासचिव प्रतिभा रघुवंशी, सचिव मनिष चौधरी, युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, उपाध्यक्ष कुणाल राऊत, सरचिटणीस हेमंत उगले यांची प्रमुख उपस्थिती होती. अंबड चौफुलीजवळ युवा क्रांती यात्रेचे आगमन झाल्यानंतर जालना जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, कल्याण दळे, राजाभाऊ देशमुख, शेख महेमूद, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, सत्संग मुंडे, राजेंद्र राख, राजेश राठोड, विजय चौधरी, विमल आगलावे, बदर चाऊस, आनंद लोखंडे, दिनकर घेवंदे, राम सावंत आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Modi's 'accumulated' will not work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.