मराठवाडा समृद्ध व्हावा -पॉल दिनाकरन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:30 AM2018-02-19T00:30:30+5:302018-02-19T00:30:35+5:30

हे प्रभू मराठवाड्यातील दुष्काळ संपवून येथे सुख- समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना डॉ. पॉल दिनाकरन यांनी मराठवाडा प्रेयर फेस्टिव्हलच्या प्रार्थना सभेत केली. दोनदिवसीय प्रार्थना सभेचा रविवारी उत्साहात समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

Marathwada should prosper - Paul Dinakaran | मराठवाडा समृद्ध व्हावा -पॉल दिनाकरन

मराठवाडा समृद्ध व्हावा -पॉल दिनाकरन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हे प्रभू मराठवाड्यातील दुष्काळ संपवून येथे सुख- समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना डॉ. पॉल दिनाकरन यांनी मराठवाडा प्रेयर फेस्टिव्हलच्या प्रार्थना सभेत केली. दोनदिवसीय प्रार्थना सभेचा रविवारी उत्साहात समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
येथील आझाद मैदानावर आयोजित मराठवाडा प्रेयर फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात माजी आ. कैलास गोरंट्याल, इकबाल पाशा, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, शरद देशमुख, यांच्यासह प्रेयर फेस्टिव्हलच्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
यावेळी दिनाकरन म्हणाले की, मनुष्याने देवाला भिऊन जीवन जगावे. देवाने शिकविलेल्या मार्गाने चालावे, असे सांगून त्यांनी मराठवाडा क्षेत्रासाठी विशेष प्रार्थना केली. या भागात पडलेल्या गारांमुळे जे नुकसान झाले ते भरून काढ, असे साकडे त्यांनी देवाकडे घातले.
पाऊस वेळेवर पडून आणि मराठवाडा सर्व संपन्न व्हावा यासाठी देखील प्रार्थना केली.
प्रार्थना करण्यासाठी २४ तास प्रार्थना योध्ये जीजस कॉल्स प्रेयर टॉवर उभारण्यात आले आहे. या वेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Marathwada should prosper - Paul Dinakaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.