लीळाचरित्र ग्रंथ आदर्शवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:46 AM2018-12-25T00:46:28+5:302018-12-25T00:46:40+5:30

महानुभावांचाच नव्हे, तर मानवतवादी तत्वज्ञानाचा कुठला ग्रंथ असेल तर तो लीळाचरित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ आदर्शवादी आहे. असा हितोपदेश महंत सुरेशराज राहेरकर यांनी दिला आहे.

Leila Charitra Book Idealist | लीळाचरित्र ग्रंथ आदर्शवादी

लीळाचरित्र ग्रंथ आदर्शवादी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
महदंबा नगरी : महानुभावांचाच नव्हे, तर मानवतवादी तत्वज्ञानाचा कुठला ग्रंथ असेल तर तो लीळाचरित्र ग्रंथ आहे. यामध्ये संस्कार, तत्वविचार दिसतात. यामुळे आज संपत्तीच्या पाठीमागे लागलेल्यांसाठी हा ग्रंथ आदर्शवादी आहे. असा हितोपदेश महंत सुरेशराज राहेरकर यांनी दिला आहे.
येथील बगडिया इंटरनॅशनल मध्ये आयोजित अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलनातील तीसऱ्या परिसंवादात सोमवारी लीळाचरित्र- संस्कार दर्शन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. राजधर सोनपेठकर, डॉ. संदीप तडस, कुलाचार्य लासूरकर महाराज, आचार्य सेवलीकर महाराज, कोठीकर महाराज आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना राहेरकर महाराज म्हणाले, १२ शतकात वनस्तपतीचा एकत्र रसायन प्रक्रियेतून सोनं कसं तयार करायचे याची प्रक्रिया या ग्रंथात आली आहे. अन्याय अत्याचाºयाच्या घटना आज आपल्या सर्वांच्याच बाजूला घडत आहेत. आजच्या शिक्षण व्यवस्थेने माणूस सुशिक्षित होत आहे. पण, तो सुसंस्कृत होती की नाही. ही महत्त्वाची बाब आहे.
वाल्या कोळ्या बदलल्याच्या आजपर्यंत आपण इतिहास ऐकत होतोत. पण, या राज्याने हा इतिहास डोळ््याने पाहिला आहे की, नागदेवाचार्यासारखा दरोडेखोर माणूस आरपार बदलला आहे. स्वामींच्या सुसंस्काराने आज तो आपल्याला लीळाचरित्र ग्रंथात दिसत आहे. तसेच माणूस अहंकाराने दूर जातो. पण, त्याला जागेवर आणण्याचे काम स्वामिंनी केले असून त्यांनी माणसांवरच नाही तर प्राण्यांवरही प्रेम केले असल्याचेही महंत सुरेशराज राहेरकर यांनी सांगितले आहे.
स्मृतीस्थळ या विषयावर बोलताना संदीप तडस म्हणाले, महानुभाव साहित्यातून मराठी भाषेचा उगम झालेला असून महानुभाव साहित्य मराठी भाषेची जननी व उगमस्थान आहे. यामुळे प्रत्येकाने एकदा तरी हा स्मृतीस्थळ हा ग्रंथ वाचावा, या ग्रंथाची भाषा साधी, सोपी व घरगुती आहे. परंतु, ती तेवढीच आत्मकल्याणाची आहे.
आज ख-या अर्थाने महानुभाव साहित्याचे संशोधन होण्याची गरज आहे. पण, आपल्याकडे खेकडे प्रवृत्ती असल्याने चळवळ निर्माण करायला गेले की मागे पाय ओढवले जात असल्याची खंतही डॉ. संदीप तडस यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Leila Charitra Book Idealist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.