सौंदर्य स्पर्धेतही मुलींना करिअरची मोठी संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 06:13 PM2019-07-20T18:13:15+5:302019-07-20T18:16:48+5:30

मराठवाड्यातील मुलींनी न्यूनगंड सोडावा

Girls also have a great opportunity in beauty contest | सौंदर्य स्पर्धेतही मुलींना करिअरची मोठी संधी

सौंदर्य स्पर्धेतही मुलींना करिअरची मोठी संधी

googlenewsNext

- संजय देशमुख 

आपण सर्वांनी मिस इंडिया, मिस वर्ल्ड असे शब्द वर्षातून कधीतरी ऐकलेले असतात. परंतु त्यातील ज्या विजेत्या मुली असतात या क्वचित प्रसंगीच मराठवाडा विभागातील असतात. परंतु आता असे कुठलेच शहराचे बंधन राहिले नाही. या स्पर्धेत ग्रामीण भागातूनही मुलींना सहभागाची संधी मिळते. जालन्यासारख्या शहरातूनही अशा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून यशाची एकेक पायरी वर चढणाऱ्या प्रतीक्षा प्रशांत नवगिरे हिने सिद्ध केले आहे. 

सौंदर्य स्पर्धेकडे कशी वळाली ?
मुळात घरातून खेळाचे वातावरण मिळाल्याने तलवारबाजी व इतर मैदानी क्रीडा प्रकारात आवड निर्माण झाली. क्रीडा प्रकारामुळे आपोआपच मन आणि शरीर स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करावा लागतो. यातूनच आपण सौंदर्य स्पर्धेतही भाग घेऊ शकतो ही कल्पना सुचली आणि या कल्पनेला वडील प्रशांत नवगिरे आणि आई विद्या यांनी प्रेरणा दिली. यातून या क्षेत्राकडे वळलो. केवळ क्षेत्रात सहभाग घेतला नाही तर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यशही खेचून आणले. परंतु हे यश अद्याप आपल्या मनासारखे नसून भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पोहोचायचे आहे.

आतापर्यंतचा प्रवास कसा झाला ?
आपण यापूर्वी वर्धा येथे झालेल्या मिस महाराष्ट्र स्पर्धेत सहभाग नोंदवून द्वितीय स्थान पटकावले होते. तर नुकत्याच मिस इंडिया टियारा आणि ठाणे टूरिझम विभागातर्फे मिस इंडिया स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेत मराठवाड्यातून सेकंड रनर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार अभिनेते राणा ऋषद आणि श्वेता खंडुरी यांच्या हस्ते मिळाला.

मराठवाड्यातील मुलींनी साहस दाखवावे
मराठवाडा म्हणजे मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो. ही ओळख पुसण्यासाठी मुलींनीही चौफेर अभ्यास केला पाहिजे. सौंदर्य स्पर्धा हे आपले काम नाही, असा गैरसमज न करता आवड आणि क्षमता असल्यास यातही चांगले करिअर करता येणे शक्य आहे.


भविष्यात जर्मनी येथे आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आपली तयारी सुरू असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाताना चालू घडामोडी, तत्पर उत्तर देण्याची समयसुचकता, शरीर स्वास्थ्य यालाही महत्त्व असून, आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आपण लक्ष ठेवून आहोत. आज मुलींना अनेक क्षेत्रात करिअर करण्याची संधी निर्माण झाली आहे. सौंदर्य स्पर्धा ही आपल्यासाठी नाही, असा समज चुकीचा आहे. - प्रतीक्षा नवगिरे

Web Title: Girls also have a great opportunity in beauty contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.