प्लाटिंगच्या वादातून जालन्यात गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 02:55 PM2017-07-28T14:55:47+5:302017-07-28T15:01:45+5:30

प्लॉटिंगच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी संतोषी माता मंदिराजवळील बक्कलगुडा भागात  घडली.

Firing in Jalna by Ploting Controversy | प्लाटिंगच्या वादातून जालन्यात गोळीबार

प्लाटिंगच्या वादातून जालन्यात गोळीबार

Next
ठळक मुद्दे बक्कलगुडा भागात राहणारे जगदीश गौड व टेकूर यांच्यात प्लॉटिंगचा जुना वाद आहे.गौड यांचा मुलगा चेतन व आकाश यांच्यात वाद झाला. जगदीश गौड यांनी टेकूरच्या दिशेने तीन राऊंड फायर केले.

ऑनलाईन लोकमत

जालन, दि.२८ : प्लॉटिंगच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी संतोषी माता मंदिराजवळील बक्कलगुडा भागात  घडली. जखमी तरुणाचे नाव आकाश ऋुषी टेकूर (२५) असून, त्याच्या डाव्या मांडीमध्ये गोळी लागली आहे. भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले, की बक्कलगुडा भागात राहणारे जगदीश गौड व टेकूर यांच्यात प्लॉटिंगचा जुना वाद आहे. शुक्रवारी दुपारी आकाश टेकूर काही व्यक्तींसह गौड यांच्या घराच्या मागील बाजूला असणा-या वादग्रस्त प्लॉटवर आला. या वेळी गौड यांचा मुलगा चेतन व आकाश यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. मुलाला मारहाण सुरू असल्याचे पाहताच जगदीश गौड परवाना असलेले रिवॉल्व्हर घेऊन बाहेर आले. त्यांनी आकाश टेकूरच्या दिशेने तीन राऊंड फायर केले. यातील तिस-या फायरमधील गोळी आकाश टेकूरच्या डाव्या मांडीत घुसल्याने तो खाली कोसळला. 

टेकुर सोबत असलेल्या व्यक्तींनी त्यास  तातडीने जवळच असलेल्या खासगी रुग्णायलात दाखल केले. टेकुर ने केलेल्या मारहाणीत चेतन गौडच्या डोक्यालाहि  मार लागला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे घटनास्थळी पोचले. त्यांनी जगदीश गौड यास रिवाल्व्हरसह ताब्यात घेतले. पंचनामा करून पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे एकत्रित केले. या प्रकरणी सदर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Firing in Jalna by Ploting Controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.