दुष्काळात एकरभर पपईने दिला आर्थिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:09 AM2018-12-18T00:09:45+5:302018-12-18T00:10:03+5:30

सततच्या दुष्काळाचा गवगवा न करता पाण्याचे योग्य नियोजन करुन जालना तालुक्यातील खणेपुरी येथील शेतकरी पांडुरंग बाबर यांनी एक एकर पपई लागवडीतून भरघोस उत्पन्न काढून निव्वळ तीन लाख रुपयांचा नफा मिळविला

Financial support given to acres of papaya in famine | दुष्काळात एकरभर पपईने दिला आर्थिक आधार

दुष्काळात एकरभर पपईने दिला आर्थिक आधार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रामनगर : सततच्या दुष्काळाचा गवगवा न करता पाण्याचे योग्य नियोजन करुन जालना तालुक्यातील खणेपुरी येथील शेतकरी पांडुरंग बाबर यांनी एक एकर पपई लागवडीतून भरघोस उत्पन्न काढून निव्वळ तीन लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. दुष्काळी परिस्थितीला खचून न जाता दुष्काळावर मात केली आहे.
नारायण बाबर यांनी गतवर्षी मार्च महिन्यात एक एकर मध्ये पपईची नऊशे रोपांची लागवड केली होती. पारंपरिक शेती करीत असताना आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन पपई लागवडीसाठी सरपंच सोपान बाबर यांनी आपणास प्रोत्साहित केल्याचे त्यांनी सांगितले लागवड केलेल्या रोपासह खते औषधी मशागत यावर जवळपास ३८ हजार रुपये खर्च आला पपई च्या एका झाडापासून त्यांना ६० ते ७० किलो पपई मिळत आहे या एका एकरातून ६० टन एवढे उत्पन्न अपेक्षित आहे. अलीकडेच त्यांनी पपई विकून तीन लाखांपर्यत उत्पन्न काढले आहे. सध्या दिल्ली येथील व्यापारी पपईची बाग बघून गेले त्यांनी १२ रुपये किलोप्रमाणे मागणीही केली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून पपईचा बाजार पडल्याने सदरील व्यापारी पपई घेण्यास मागेपुढे करू लागले खर्च वजा जाता जवळपास ६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. आपण मार्केटिंगची घाई करीत नाही. भाव वाढ होणार याकडे लक्ष लागून आहे शक्य आहे.तोपर्यंत आपण पपईची कमी दरात विक्री करणार नाही स्थिर भाव मिळत नसल्याची खंत बाबर यांनी व्यक्त केली. यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे रबी हंगामाची वाट लागली. खरीप हंगामातही म्हणावे तसे फार काही हाती लागले नाही. पपई उत्पन्नातून हाती पैसा आल्याचे समाधान बाबर यांनी व्यक्त केले.

Web Title: Financial support given to acres of papaya in famine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.