निधी येऊनही पोलिसांना बक्षीस मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:57 AM2018-07-18T00:57:47+5:302018-07-18T00:58:21+5:30

सण उत्सव तसेच आपातकालीन परिस्थितीत चोख कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना बक्षीस वाटप करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले होते. त्यासाठी राज्यातील सात परिक्षेत्रासाठी ४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

Even after receiving funds, the police don't getting reward | निधी येऊनही पोलिसांना बक्षीस मिळेना

निधी येऊनही पोलिसांना बक्षीस मिळेना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सण उत्सव तसेच आपातकालीन परिस्थितीत चोख कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना बक्षीस वाटप करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले होते. त्यासाठी राज्यातील सात परिक्षेत्रासाठी ४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. औरगाबाद परिक्षेत्रासाठी २१ लाख ५२ हजार ६०७ रूपयांच निधीस सहा महिने उलटून झाले तरी अद्यापही निधी वाटपास गती मिळालेली नाही.
राज्यात २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर २०१७ या कालावधीत सण उत्सव होते. आॅगस्ट महिन्यात मुंबई व परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी पोलिसांनी वित्तहानी व जीवहानी होऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. या कामगिरीकरिता पाच कोटी रुपये बक्षीस वितरित करण्यास राज्याच्या गृहविभागाने मान्यता दिली होती. या अनुषंगाने पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्य राखीव बल गट १ ते १६ यांना उपलेखाशिर्ष बक्षीस उद्दिष्टाखाली म्हणून चार कोटी बीडीएस प्रणालीवर उपलब्ध केले. यात औरंगाबाद परिक्षेत्रासाठी २१ लाख ५२ हजार रुपयाच्या निधी प्राप्त होऊन सहा महिने झाले आहेत. मात्र अद्यापही औरंगाबाद परिक्षेत्रात येत असलेल्या जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाला अशा प्रकारचा निधीच मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
रकमेचे वाटप कधी ?
गृह विभागाने चार कोटी रुपये मंजूर केले. तसेच अपर पोलीस महासंचालकांनी पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचाºयांना बक्षीस स्वरुपात रक्कम त्वरित उपलब्ध करुन दिली तरीही रक्कम वाटपास पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Even after receiving funds, the police don't getting reward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.