अतिक्रमण हटाव मोहीम दुस-या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:23 AM2017-11-29T00:23:45+5:302017-11-29T00:23:49+5:30

जालना : शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम मंगळवारी दुस-या दिवशीही सुरूच होती. नवीन जालन्यात आझाद मैदान ते मंठा ...

The encroachment campaign started on the next day | अतिक्रमण हटाव मोहीम दुस-या दिवशीही सुरूच

अतिक्रमण हटाव मोहीम दुस-या दिवशीही सुरूच

googlenewsNext

जालना : शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम मंगळवारी दुस-या दिवशीही सुरूच होती. नवीन जालन्यात आझाद मैदान ते मंठा चौफुली दरम्यान असलेली अतिक्रमणे दिवसभरात हटविण्यात आली. तसेच एसआरपीएफ वसाहती समोर अनधिकृतरीत्या थाटलेली दुकानेही या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली.
अतिक्रमण हटाव मोहिमेला सकाळी आझाद मैदान परिसरातील साई मंदिरापासून सुरुवात झाली. संपूर्ण मंदिरच पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी नगरपालिका व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आझाद मैदान परिसरातील हनुमान मंदिराचे अतिक्रमणही हटविण्यात आले. त्यानंतर अतिक्रमण हटाव पथकाने आपला मोर्चा मंठा चौफुलीकडे जाणा-या रस्त्यावर उजव्या बाजूने थाटण्यात आलेल्या दुकानांकडे वळविला. एसआरपीएफ वसाहतीसमोरील रस्त्यावर थाटण्यात आलेली जवळपास १५ गॅरेज, मांस विक्रीची दुकाने, हॉटेल्स, टपºया पथकाने जमीनदोस्त केल्या. मंगळवारी झालेल्या कारवाईत मंठा चौफुलीवरील हजरत सय्यद सादक दर्गा, साई मंदिर, सिंदखेडराजा रस्त्यावरील म्हसोबा मंदिर, सुखशांतीनगरातील बजरंगबली मंदिर, पेन्शनपुºयातील शीतलामाता मंदिर, गोपाळपु-यातील लक्ष्मीमाता मंदिर, गोपीकिशन नगरातील जयमाताई मंदिर, बसस्थानक रस्त्यावरील संग्रामनगरातील साईबाबा मंदिर, फुलंब्रीकर नाट्यगृह परिसरातील म्हसोबा मंदिर, राजबिल्डिंग परिसरातील सय्यद सादक दर्गा ही धार्मिक स्थळांची अतिक्रमणे हटविण्यात आली. शहरातील सर्व १०९ धार्मिक स्थळांची अतिक्रमणे जोपर्यंत हटविली जात नाहीत, तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील, असे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: The encroachment campaign started on the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.