दानवे पती-पत्नी कोट्यधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 01:00 AM2019-04-03T01:00:10+5:302019-04-03T01:00:45+5:30

सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंंगणात उतरलेले भाजपचे खा. रावसाहेब दानवे हे स्वत: आणि त्यांची पत्नी निर्मला दानवे हे दोघेंही कोट्यधीश असल्याचे रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार पुढे आले आहे.

Demon husbands katyudhid | दानवे पती-पत्नी कोट्यधीश

दानवे पती-पत्नी कोट्यधीश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंंगणात उतरलेले भाजपचे खा. रावसाहेब दानवे हे स्वत: आणि त्यांची पत्नी निर्मला दानवे हे दोघेंही कोट्यधीश असल्याचे रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार पुढे आले आहे.
१९९९ पासुन रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत. चारही वेळेस ते विजयी झाले आहे. यावेळी पुन्हा त्यांनी त्यांचे भविष्य मतदारांच्या हाती सोपविले आहे.
२०१४ मधील लोकसभेचा विचार करता त्यावेळी दानवेंची संपत्ती ही १५ कोटी ३७ लाख ४० हजार ६०० रूपये होती. तर त्यावेळी त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्या नावावर २ कोटी २७ लाख ९६ हजार एवढे बाजारमुल्य असलेली संपत्ती होती. रावसाहेब दानवेंच्या नावावर ९ हेक्टर ४२ आर जमीन असून, पत्नीच्या नावे ६ हेक्टर शेती आहे. निर्मला दानवे यांच्या नावावर चालू वर्षात २० लाख ७७ हजार ७४३ रूपयांची गुंतवणूक दाखविण्यात आलेली आहे. तर चालू वर्षात निर्मला दानवे यांची संपत्ती ३ कोटी ६४ लाख ८८ हजार रूपये दर्शविली आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत रावसाहेब दानवे यांच्या संपत्तीत ६६ लाख रूपयांची वाढ झाली असून, पत्नीच्या संपत्तीत चक्क १ कोटी ३७ लाख रूपयांची वाढ झाल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या पत्नीला ८ लाख ५० हजार रूपयांचे कर्ज दिले असून, मुलगा आ. संतोष दानवे यालाही २५ लाख ५० हजार रूपयांचे कर्ज दिले असल्याचे नमूद केले आहे. दानवे यांच्याकडे आजघडीला अनेक नवनवीन चारचाकी गाड्याचे मॉडेल असले तरी शपथपत्रात मात्र त्यांनी एक अ‍ॅम्बेसेडर असल्याचे दर्शविले आहे.
दानवेंकडे सोन्याच्या तुलनेत चांदी मोठ्या प्रमाणावर असून, ती जवळपास ४०० किलोचे दागदागिने असल्याचे नमूद केले आहे. दानवे यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि समाजकार्य दर्शविला असून, लातूर आणि पैठण येथील दोन गुन्हे दानवें विरूद्ध नोंद आहेत. पैठण येथे नगर पालिकेच्या निवडणुकीच्यावेळी त्यांनी केलेले ‘लक्ष्मीदर्शनाचे’ वक्तव्य यावरून नगर पालिका अधिनियम १९६५ च्या (२२) १ कलमानुसार हा गुन्हा दाखल असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.

Web Title: Demon husbands katyudhid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.