महागाईच्या झटक्याने जालनेकर बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:37 AM2018-09-30T00:37:48+5:302018-09-30T00:38:59+5:30

परभणी पाठोपाठ जालनेकरांनाही पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत असून, इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने जालनेकर चांगलेच धास्तावाले आहे

Bareja by going in inflation | महागाईच्या झटक्याने जालनेकर बेजार

महागाईच्या झटक्याने जालनेकर बेजार

Next

दीपक ढोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : परभणी पाठोपाठ जालनेकरांनाही पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत असून, इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने जालनेकर चांगलेच धास्तावाले आहे. त्यातच पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. असे चित्र असतांनाच नागरिकांना दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.
पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महागाईच्या झळा सर्वसामान्यांना चांगल्याच बसू लागल्या आहेत. यामध्येच परभणीनंतर जालन्यातही पेट्रोल व डिझेलच्या दरांने नव्वदी पार केली. त्यामुळे नागरिकांना आपला खिसा अधिकच खाली करावा लागत आहे. शनिवारी जालना शहरात ९१.६५ रुपयाने पेट्रोलची तर ७८.८८ रुपयांने डीझेलची विक्री झाली. मागील पंधरा ते वीस दिवसापासून पेट्रोल व डीझेलचे भाव १० ते २० पैसाने वाढत आहे.
दररोज पेट्रोल व डीझेलचे भाव वाढत असून, याचा परिणाम, शहरातील वाहतुकीच्या दरांमध्ये होत आहे. यामुळे आॅटोचालकही भाव वाढ करण्याच्या विचारात आहेत. सध्या कैन्हयानगरकडे जाण्यासाठी १५ रुपयाचा दर ठेवण्यात आला आहे. शहरातील इतर ठिकाणी जाण्यासाठी दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. परंतु, येत्या काही दिवसात दर वाढु शकते. यानंतर आता बाजारातील भाजीपाल्यांचे दरही वाढण्याची शक्यता आहे.
या भावाढीमुळे सामान्य नागरिक अडचणीत आले आहे. त्यातच जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरीही चिंतेत सापडला आहे.
त्यामुळे केंद्र शासनाने इंधन दरवाढीवर आळा घालून इंधनाचे दर जीएसटीमध्ये आणावेत अशी मागणी नागरिक करीत आहे.
भाजीपाल्याचे भावही गडगडले
एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. सध्या टोमॅटो ५ रुपये किलो, मिरची २५ ते ३० रुपये किलो, फुल कोबी ३० ते ३५ रुपये किलो, आलु २० ते २५ किलो, कांदा १५ ते२० रुपये किलो, भेंडी २० ते २५ रुपये किलों विकली जात आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.

 

Web Title: Bareja by going in inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.