कृषीसोबतच आता शिक्षणातही पाणलोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:24 AM2019-06-02T00:24:43+5:302019-06-02T00:25:22+5:30

जालना येथे कार्यरत असलेल्या मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्यावतीने गेल्या दशकात जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणलोटाची कामे करण्यात आल्याने ती गावे पाणीदार झाली आहे.

 Along with agriculture, the watershed is also in education | कृषीसोबतच आता शिक्षणातही पाणलोट

कृषीसोबतच आता शिक्षणातही पाणलोट

Next

विष्णू वाकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रामनगर : जालना येथे कार्यरत असलेल्या मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्यावतीने गेल्या दशकात जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणलोटाची कामे करण्यात आल्याने ती गावे पाणीदार झाली आहे. या मंडळाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ज्ञानगंगा गावोगावी पोहचवून जणू शिक्षणातही पाणलोट करून मुलांना बदलत्या प्रवाहात आणून सोडले आहे.
मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या माध्यमातून कृषीरत्न विजयअण्णा बोराडे आणि त्यांचे सहकारी यांनी २००३ मध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. महिन्याला शेतकऱ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शेती व्यवसायात शिक्षित करण्याचा सुरू केलेला प्रयत्न आजही कायम आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायात कृषी विज्ञान केंद्रामुळे चांगले परिवर्तन घडून आले. ब-याच शेतक-यांच्या यशोगाथा तयार झाल्या. ते कृषी विज्ञान केंद्रामुळे. पाणलोटमध्येही आसरखेडा असो की कडवंची ते शिवणीसह बहुतांश गावांनी वाहते पाणी थांबविले. यामुळे पाणलोटाची कामे झालेली गावे आजही भयावह दुष्काळावर मात करीत आहेत.
कृषी विज्ञान केंद्रात हजारो महिला, युवक व युवतींना वेगवेगळे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न पूर्ण केले गेले. रेशीम उद्योगपासून ते शेळीपालनापर्यंत शेतीपुरक व्यवसायाची सुरुवात मोठ्या प्रमाणात महिला तसेच पुरुषांनी केली आहे.
हे काम करीत असताना मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या नजरेतून सद्य स्थितीतील शिक्षणातील स्पर्धा सुटली नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी येथे निवासी शाळा असावी असा विचार पुढे आल्यानंतर कृषीरत्न विजयअण्णा बोराडे तसेच कृषीभूषण भगवानराव काळे आणि येथील विश्वस्त यांनी आमची शाळा नावाची निवासी शाळा २००३ मध्ये खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरू केली. २००८ मध्ये दहावीची पहिली बॅच १०० टक्के निकाल देऊन बाहेर पडली.
मुलींनाही शिक्षण
२०१२ च्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतक-यांच्या मुलींनाही येथे शिक्षण देण्यात आले. एवढेच नाही तर २००४ मध्ये कृषी तज्ञ विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्यालयातून जवळपास ५०० विद्यार्थी कृषी पदविकाधारक बनले. जिल्ह्यात कृषी शिक्षणात मानाचा तुरा खोवणाºया कृषी महाविद्यालयाची सुरूवात २००८ मध्ये करण्यात आली. या महाविद्यालयात आतापर्यंत जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी बीएससी अ‍ॅग्रीचे शिक्षण पूर्ण करून बहुसंख्येने आता आपल्या पायावर उभे आहेत.

Web Title:  Along with agriculture, the watershed is also in education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.