कृषी अधिकारी थेट शेतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:58 AM2018-07-26T00:58:32+5:302018-07-26T00:58:52+5:30

घनसावंगी तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी बालासाहेब हरबक यांच्या शेतातील कपाशीमध्ये बोंड अळीची पहिली पिढी दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी प्रसिध्द करताच, कृषी विभाग खडबडून जागा झाला. बुधवारी सकाळी कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे व अन्य कृषी अधिकाऱ्यांनी चापडगाव गाठून कपशीची पाहणी केली.

Agriculture Officer directly in the field ... | कृषी अधिकारी थेट शेतात...

कृषी अधिकारी थेट शेतात...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घनसावंगी तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी बालासाहेब हरबक यांच्या शेतातील कपाशीमध्ये बोंड अळीची पहिली पिढी दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी प्रसिध्द करताच, कृषी विभाग खडबडून जागा झाला. बुधवारी सकाळी कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे व अन्य कृषी अधिकाऱ्यांनी चापडगाव गाठून कपशीची पाहणी केली.
दोन दिवसांपूर्वी कृषी विज्ञान केंद्राच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर हरबक यांनी शेतातील कपाशीत बोंड अळी असल्याची पोस्ट टाकली.
ही पोस्ट वाचल्यावर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.व्ही. सोनुने, पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी यांनी तातडीने चापडगाव येथे भेट देऊन पाहणी केली असता, त्यांना बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. त्यांनी शेतक-यांना घाबरून न जाता यावरील उपाय योजनांची माहिती दिली. तसेच याची माहिती कृषी विभागाचे अधीक्षक दशरथ तांभाळे, जिल्हा गुण नियंत्रक सायप्पा गरांडे यांना कळविली. त्यांनी तातडीने गुरूवारी सकाळी चापडगाव येथे हरबक यांच्या शेतात भेट दिली. यावेळी त्यांनी ५० टक्के अनुदानातून परिसरातील शेतकºयांना कीटक नाशकांचे वाटप करून ते तातडीने फवारणी करण्याचे सांगितले.
यावेळी शेतक-यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
चापडगाव येथील शेतकरी हरबक यांच्या शेतात जाण्यासाठीच्या रस्त्यावर पावसामुळे सर्वत्र चिखल होता. जीप जाणे तेथून शक्य नसल्याने कृषी विज्ञान केंद्राचे सोनुने आणि मिटकरी यांनी मोटारसायकलवरून जाऊन हरबक यांच्या शेतातील बोंड अळीची पाहणी केली.

Web Title: Agriculture Officer directly in the field ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.