‘स्वाधार’साठी ६४८ जणांनी केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 01:21 AM2018-12-27T01:21:16+5:302018-12-27T01:21:39+5:30

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ६४८ विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज केले आहेत.

648 candidates filed for 'Swadhara' | ‘स्वाधार’साठी ६४८ जणांनी केले अर्ज

‘स्वाधार’साठी ६४८ जणांनी केले अर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ६४८ विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज केले आहेत. तर १३८ जणांनी ‘रिनवेल’ अर्ज केले आहेत. तर कागदपत्रांची तातडीने पूर्तता केलेल्या १५६ जणांना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला असून दोन- चार दिवसात ४६ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र परंतु, प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभराचा शैक्षणीक खर्च भागविता येतो.
या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागातर्फे आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून अर्ज स्वीकारणे सुरू करण्यात आले आहे.
अद्यापही अर्ज घेतले जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ६४८ विद्यार्थ्यांनी नव्याने तर १३८ जणांनी रिनवेल अर्ज केले आहेत. यातील १५६ विद्यार्थ्यांना या योजनेचा आतापर्यंत लाभ मिळाला आहे. तर ४६ जणांच्या बँक खात्यावर दोन- चार दिवसात रक्कम जमा होणार आहे. चालू वर्षातील विद्यार्थ्यांना या योजनेचा तातडीने लाभ देण्यात येत आहे. मात्र, मागील वर्षीचे ४० विद्यार्थ्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
हेच ठरणार लाभार्थी
विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक कोर्स पूर्ण करताना विद्यार्थ्याला एकदाच एटीकेटी असलेले विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत.

Web Title: 648 candidates filed for 'Swadhara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.