दीड वर्षात ५५ खून..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:19 AM2019-06-21T00:19:20+5:302019-06-21T00:19:38+5:30

मागील दीड वर्षात जिल्हाभरात खुनाच्या तब्बल ५५ घटना घडल्या आहेत.

55 murders in a half year ..! | दीड वर्षात ५५ खून..!

दीड वर्षात ५५ खून..!

googlenewsNext

दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात हाणामाऱ्या, चोºया, दरोड्यांचे सत्र सुरूच आहे. त्यात आता खुनाच्या घटनांमध्येही मोठी वाढ होताना दिसत आहे. मागील दीड वर्षात जिल्हाभरात खुनाच्या तब्बल ५५ घटना घडल्या आहेत.
या रक्तरंजित घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेला नियंत्रित करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. दरम्यान, खुनाच्या दाखल ५४ गुन्ह्यांपैकी ५१ प्रकरणांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित प्रकरणांमधील आरोपींनाही जेरबंद करण्यात आले आहे.
उद्योगनगरी म्हणून जालन्याची ओळख आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात खुनाच्या घटना वाढत चालल्या आहेत. जमिनीचे वाद, संपत्ती, पूर्ववैमनस्य, किरकोळ कारण, हेवे दावे, अनैतिक संबंध अशा अनेक कारणांवरून एकमेकांचे मुडदे पाडण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. दगडाने ठेचून, शस्त्राचे वार करून निर्दयीपणे खून केले जात आहेत. वाढलेल्या हाणामाऱ्यांसह इतर घटनांना आळा घालण्यासाठी
पोलीस प्रशासनाला कडक पावले उचलावी लागणार आहेत.
पोलिसांसमोर आव्हान : जून महिन्यात वाढ
२०१८ या वर्षात जिल्ह््यात ४१ खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ३८ खुनाच्या घटनांचा उलगडा पोलिसांनी केला आहे. तर २०१९ मध्ये मे महिन्यापर्यंत जिल्हाभरात १४ जणांचा खून झाला आहे. त्यापैकी १३ प्रकरणांचा उलगडा झाला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही प्रमाणात खुनाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र, जून महिन्यात खुनाच्या घटना वाढल्या आहेत. चो-या, दरोड्यांसह खुनाच्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरत असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले.

Web Title: 55 murders in a half year ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.