२८० शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:09 AM2018-12-13T01:09:56+5:302018-12-13T01:11:16+5:30

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील २८० शेतकºयांना अद्यापही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. पीक विमा काढल्यानंतर वर्ष उलटून गेले; पण पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. विमा कंपन्यांनी विमा जमा न केल्याने २८० शेतकºयांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहे.

280 farmers wait for crop insurance | २८० शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

२८० शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देवर्ष उलटले; पण मिळाला नाही पीक विमा, कृषी विभागाकडे तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील २८० शेतकºयांना अद्यापही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. पीक विमा काढल्यानंतर वर्ष उलटून गेले; पण पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. विमा कंपन्यांनी विमा जमा न केल्याने २८० शेतकºयांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांनी पीक विमा काढला होता. पीक विमा हप्त्याची रक्कम (प्रीमियम) संबंधित बँकेत जमा करून, जिल्ह्यातील शेतकºयांनी कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांचा विमा काढला. पीक विमा काढलेल्या शेतकºयांपैकी विम्याचा लाभ मंजूर झालेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ओरियटल इन्श्युरन्स कंपनीमार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील काही शेतकºयांच्या खात्यात विमा कंपनीमार्फत पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली; परंतु पीक विम्याची रक्कम मंजूर झालेल्या २८० शेतकºयांच्या खात्यात अद्याप पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली नाही.
पीक विमा काढल्यानंतर वर्ष उलटून गेले; पण अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने, विम्याची रक्कम खात्यात जमा केव्हा होणार, याबाबत जिल्ह्यातील पीक विम्याच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

Web Title: 280 farmers wait for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.