शी जिनपिंग चीनचे तहहयात ‘बादशाह’, निरंकुश सत्तेसाठी बदलली राज्यघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 03:04 AM2018-03-12T03:04:55+5:302018-03-12T03:04:55+5:30

चीन या जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या आणि अफाट लष्करी व आर्थिक ताकद असलेल्या देशाने रविवारी शी जिनपिंग यांच्या हाती निरंकुश सत्ता बहाल केली.

 Xi Jinping News | शी जिनपिंग चीनचे तहहयात ‘बादशाह’, निरंकुश सत्तेसाठी बदलली राज्यघटना

शी जिनपिंग चीनचे तहहयात ‘बादशाह’, निरंकुश सत्तेसाठी बदलली राज्यघटना

Next

बीजिंग - चीन या जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या आणि अफाट लष्करी व आर्थिक ताकद असलेल्या देशाने रविवारी शी जिनपिंग यांच्या हाती निरंकुश सत्ता बहाल केली.
शी यांना इच्छा असेल तोपर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहता यावे यासाठी चीनच्या संसदेने देशाची राज्यघटना जवळजवळ एकमताने बदलली. चीन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस हे सर्वोच्च पद शी यांच्याकडे आहेच व त्यालाही कोणतीही कालमर्यादा नाही. अशा प्रकारे शी हे
माओ यांच्या तोडीचे प्रबळ नेते झाले आहेत. (वृत्तसंस्था)

सर्वेसर्वा : पक्ष, सरकार आणि सैन्यदले या सर्वांची सत्ता ६४ वर्षांच्या शी यांच्या हाती एकवटली आहे. यापूर्वी माओ व डेंग शियाओ पिंग हे चीनचे सर्वशक्तिमान नेते म्हणून ओळखले गेले. परंतु त्यांच्या सत्तेलाही राज्यघटनेचे कमाल १० वर्षांचे बंधन होते.

घटनेत नेमका काय बदल?

चीनच्या राज्यघटनेत राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष यांच्या पदांना प्रत्येकी पाच वर्षांच्या सलग दोन कालावधींची कमाल मर्यादा होती. शी यांची सध्या या पदावरील दुसरी ‘टर्म’ सुरु आहे.
त्यानंतरही त्यांना पदावर राहता यावे यासाठी राज्यघटनेतील ही कमाल मर्यादा काढून टाकण्याचा प्रस्ताव कम्युनिस्ट पक्षाने केला. राष्ट्रीय पीपल्स काँग्रेस या चीनच्या संसदेने तो २,९७३ वि. २ अशा बहुमताने मंजूर केला. तिघांनी मतदानात भाग घेतला नाही.

Web Title:  Xi Jinping News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.