'शाकाहार हाच आहार' मानणारे देश, या देशांमध्ये राहातात सर्वाधिक शाकाहारी लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 01:27 PM2018-07-30T13:27:54+5:302018-07-30T13:28:18+5:30

काही देशांमध्ये शाकाहारी लोक जास्त संख्येने आढळतात तर बहुतांश देशांमध्ये मांस, मासे खाणारे लोक आढळतात.

Which Countries Are Largely Vegetarian? | 'शाकाहार हाच आहार' मानणारे देश, या देशांमध्ये राहातात सर्वाधिक शाकाहारी लोक

'शाकाहार हाच आहार' मानणारे देश, या देशांमध्ये राहातात सर्वाधिक शाकाहारी लोक

googlenewsNext

मुंबई- पाश्चिमात्य देशांमध्ये मांस व प्राणीजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त आहे. तरिही गेल्या काही काळामध्ये शाकाहाराचा प्रसार जगभरामध्ये होत आहे. काही देशांमध्ये शाकाहारी लोक जास्त संख्येने आढळतात तर बहुतांश देशांमध्ये मांस, मासे खाणारे लोक आढळतात. अमेरिकेतील प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी 120 किलो इतके मांस खातो. 

जगभरात शाकाहारी लोकांचे प्रमाण लक्षणीय असणारे देश पुढीलप्रमाणे

भारत- भारतामध्ये 31 टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे. भारतामध्ये शाकाहारी लोकांमध्ये दुग्धजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त आहे  तसेच काही ठराविक दिवसांमध्ये शाकाहारच करणारे लोकही भारतात आहेत.

इस्रायल- इस्रायल हा चिमुकला देश असला तरी त्याच्या 80लाख  लोकसंख्येपैकी 2 लाख लोक शाकाहारी आहेत.

युनायटेड किंग्डम-  युनायटेड किंग्डममध्ये साधारणतः 15 ते 20 टक्के लोक शाकाहारी असल्याचे अहवाल सांगतात.

तैवान- तैवानमध्ये 10 टक्के लोकसंख्या शाकाहारी असून सरकारही शाकाहारी अन्नाला व जीवशैलीला प्रोत्साहन देते.

जमैका- जमैकामध्ये जेवणामध्ये भात, फळे आणि भाज्यांचा समावेश सर्वाधिक असतो. तेथे सध्या शाकाहारी लोकांचे प्रमाण वाढत आहे. रास्ताफारी नावाच्या चळवळीमुळे 8 ते 10 टक्के लोकसंख्या शाकाहारी बनली आहे.

जर्मनी - मांस खाणे सोडून देण्याचे प्रमाण जर्मनीमध्ये वाढत असून 70 लाख लोक शाकाहारी या देशात राहात असावेत असे अहवाल स्पष्ट करतात.

 स्वीर्त्झलँड- या देशात 3 टक्के लोकसंख्य़ा शाकाहारी असून येथे भाज्या आणि दुधाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

मांस खाणारे जगातील काही देश (प्रती व्यक्ती आणि प्रतीवर्षी, किलोमध्ये)

भारत 4.4, बांगलादेश 4, बुरुंडी 5.2, श्रीलंका 6.3, रवांडा 6.5, सिएरा लिओन 7.3, इरिट्रिया 7.7, मोझांबिक 7.8. गांबिया 8.1, मालावी 8.3

Web Title: Which Countries Are Largely Vegetarian?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.