युद्धाची चाहुल ! उत्तर कोरियात 47 लाख लोकांना व्हायचंय सैन्यात भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 06:29 PM2017-09-28T18:29:23+5:302017-09-28T18:33:50+5:30

कोरियन द्विपकल्पात गेल्या काही दिवसांपासून युद्धाचं वादळ घोंगावतं आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियामधला तणाव जागतिक स्तरावरचं मोठं संकट बनत चाललंय. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता वारंवार अण्वस्त्र चाचणी करणारा उत्तर कोरिया हा देश जागतिक समुदायाच्याही निशाण्यावर आहे.

War of war! In the North, recruiting 47 lakh people to join the army | युद्धाची चाहुल ! उत्तर कोरियात 47 लाख लोकांना व्हायचंय सैन्यात भरती

युद्धाची चाहुल ! उत्तर कोरियात 47 लाख लोकांना व्हायचंय सैन्यात भरती

googlenewsNext

प्योंगयांग, दि. 28 - कोरियन द्विपकल्पात गेल्या काही दिवसांपासून युद्धाचं वादळ घोंगावतं आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियामधला तणाव जागतिक स्तरावरचं मोठं संकट बनत चाललंय. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता वारंवार अण्वस्त्र चाचणी करणारा उत्तर कोरिया हा देश जागतिक समुदायाच्याही निशाण्यावर आहे.

अमेरिका आणि उत्तर कोरियामधील शाब्दिक चकमकीमुळे युद्धाचे ढग दाटू लागले आहेत. त्यातच आता उत्तर कोरियात 47 लाख लोक सैन्यात स्वेच्छेनं सहभागी होण्यास तयार झाले आहेत. एकाच वेळी एवढ्या लोकांनी सैन्यात भरती होण्याची इच्छा व्यक्त केल्यानं उत्तर कोरिया युद्धाची तयारी तर करत नाही ना, अशी साशंकता व्यक्त केली जातेय. किम जोन ऊन यांच्या सरकारमधील बातम्या फक्त राज्यातील नियंत्रित मीडियातूनच बाहेर येतात. उत्तर कोरियाच्या सरकारची वृत्तसंस्थेनं स्वेच्छेनं लोक सैन्यात भरती होण्यास तयार असल्याची माहिती दिली आहे. रोडोंग सिनमन दैनिकाच्या रिपोर्टनुसार, विद्यार्थी आणि कामगारांसह 12.2 लाख महिलांचाही सहभाग आहे. उत्तर कोरियाच्या नागरिकांना गेल्या 6 दिवसांपूर्वी कोरियन पीपल्स आर्मीत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
काही दिवसांपूर्वी चीननंही अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या वादात उडी घेतली होती.

जर कोरियन द्विपकल्पात युद्ध झालं, तर कोणीही जिंकणार नाही, असं विधान चीननं केलं होतं. विशेष म्हणजे उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री यांच्या इशा-यानंतर चीननं विधान केलं होतं. त्यामुळे चीनच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालं आहे. उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले होते, ट्रम्प यांच्या विधानवरून त्यांनी युद्धाची घोषणा केली असून, उत्तर कोरिया या युद्धाला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. त्यानंतर चीननंही या वादात युद्ध झाल्यास कोणीही जिंकणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. अमेरिका व उत्तर कोरियाचे राजकर्त्यांना कदाचित हे माहिती असेल की, सैन्याच्या माध्यमातून युद्ध करणं ही व्यवहार्य पद्धत नाही, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त लू कांग म्हणाले होते.

उत्तर कोरियाच्या विदेश मंत्र्यांच्या विधानानंतर व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव साराह सेंडर्स यांनीही नवं प्रसिद्धीपत्रक जारी केलं होतं. या पत्रकात अमेरिकेनं कोणत्याही पद्धतीच्या युद्धाची घोषणा केली नाही, उत्तर कोरियाचे आरोप बिनबुडाचे आणि निराधार असल्याचंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं. हुकूमशहा किम जोंग-उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग-उनचा रॉकेट मॅन असा उल्लेख केल्यानंतर खवळलेल्या उत्तर कोरियाने डोनाल्ड ट्रम्प हे आत्महत्या करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली होती.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री रि योंग हो म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांचा उल्लेख रॉकेटमॅन असा केला होता. त्यामुळे अमेरिकेच्या मुख्य भूमीच्या दिशेने रॉकेट सोडणे अनिवार्य झाले होते. दीर्घ आणि कठीण संघर्षानंतर आम्ही अणुऊर्जा निर्मिती करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर निर्बंध घातल्याने आमच्या भूमिकेत बदल होईल असे मानणे चुकीचे ठरेल." गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकी वायूसेनेची बी-1बी ही बॉम्बवाहू विमाने उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरून घिरट्या घालून गेली होती. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना ट्रम्प यांनी उत्तर कोरियावर अधिकचे निर्बंध घातले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा दिला होता. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कडक भाषा वापरलेल्या भाषणात उत्तर कोरियाला अणू क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम सुरू न ठेवण्याचा इशारा दिला. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा उल्लेख ‘रॉकेट मॅन’ असा करून त्याचा देश नष्ट करण्याची धमकी दिली. ‘अमेरिकेकडे प्रचंड शक्ती आणि संयम आहे; परंतु आम्हाला स्वत:चे व किंवा आमच्या मित्रदेशांचे संरक्षण करणे भाग पडले तर उत्तर कोरियाला पूर्णपणे नष्ट करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नसेल,’ असे ट्रम्प म्हणाले. 

Web Title: War of war! In the North, recruiting 47 lakh people to join the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.