लंडन : भारताशी युद्ध हा पर्याय योग्य नसून, काश्मीर व अन्य प्रश्न केवळ चर्चेद्वारेच माध्यमातून सोडवता येतील, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी व्यक्त केले. लंडन स्कूल आॅफ इकनॉमिक्सच्या दक्षिण आशिया केंद्रामध्ये ‘फ्युचर आॅफ पाकिस्तान २०१७’ या विषयावर ते म्हणाले की, काश्मीर प्रश्न निश्चितच गंभीर व वादाचा मुद्दा आहे. त्यावर तोडगा निघेपर्यंत भारताबरोबरचे तणावाचेच राहतील. स्वतंत्र काश्मीरच्या विचाराला आपला पाठिंबा नाही, असेही शाहीद अब्बासी यांनी स्पष्ट केले. काश्मीरबाबत जोपर्यंत तोडगा निघणार नाही, तोपर्यंत भारत व पाकिस्तान यांच्यात तणाव राहील, असे ते म्हणाले.
दोन्ही देशांत २0१९ साली निवडणुका असल्याने तोपर्यंत सुसंवादाची शक्यता नाही. दोन्हीपैकी एकही देश काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी चर्चेसाठी पुढाकार घेईल, असे आपणास वाटत नाही, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)