कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 01:04 PM2018-10-21T13:04:05+5:302018-10-21T13:26:06+5:30

बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवून देशाबाहेर पलायन केलेला किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्ल्याच्या लंडनमधील अलिशान हवेलीवर टाच येण्याची शक्यता आहे.

vijay mallya may lose london mansion for ubs loan | कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार

कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार

googlenewsNext

नाओमी केंटन - बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवून देशाबाहेर पलायन केलेला किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्ल्याच्या लंडनमधील अलिशान हवेलीवर टाच येण्याची शक्यता आहे. स्विस बँकेने माल्ल्यासह त्याची आई आणि मुलाला या हवेलीतून बाहेर काढण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. सरकारी बँकांप्रमाणेच माल्ल्याने स्विस बँकेकडेही घर गहाण ठेवून कर्ज घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भारतातून फरार झाल्यानंतर तो लंडनमध्ये लपून बसला आहे. नाओमी केंटन येथील रेजेन्ट पार्कमध्ये माल्ल्याची अलिशान हवेली आहे. माल्ल्याने हवेली गहाण ठेवून  UBS AG या स्विस बँकेकडून सुमारे 2.4 कोटी पाउंड म्हणजे 195 कोटीचं कर्ज घेतलं होतं. मात्र मुदत संपल्यानंतरही त्याने कर्ज न फेडल्याने हवेली जप्त करण्यासाठी बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी लंडन कोर्टात विजय माल्ल्या, त्याची आई ललिता माल्ल्या आणि मुलगा सिद्धार्थ माल्ल्या यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.  24 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Web Title: vijay mallya may lose london mansion for ubs loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.