पाकच्या राष्ट्रीय प्राण्याची त्यानं केली शिकार अन् भरावा लागला 78 लाखांचा दंड  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 02:12 PM2019-02-06T14:12:40+5:302019-02-06T14:15:49+5:30

एका अमेरिकी व्यक्तीनं पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या मारखोरची शिकार केली आहे.

US man pays record ₹78 lakh to hunt Pakistan's national animal | पाकच्या राष्ट्रीय प्राण्याची त्यानं केली शिकार अन् भरावा लागला 78 लाखांचा दंड  

पाकच्या राष्ट्रीय प्राण्याची त्यानं केली शिकार अन् भरावा लागला 78 लाखांचा दंड  

googlenewsNext

इस्लामाबाद- एका अमेरिकी व्यक्तीनं पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या मारखोरची शिकार केली आहे. गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतात मारखोर या प्राण्याची शिकार केल्यानं एका अमेरिकन व्यक्तीला 1, 10,000 डॉलर (78 लाख)चा दंड भरावा लागला आहे. त्या व्यक्तीला परमिट शुल्काद्वारे 78 लाख रुपये भरावे लागले आहेत. पाकिस्तानमध्ये शिकारीच्या परमिटसाठी मिळालेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. मारखोर हा प्राणी पाकिस्तानच्या सुरक्षित प्राण्यांच्या प्रजातीच्या अंतर्गत येतो. या प्राण्याच्या शिकाराची परवानगी नाही.

सरकार या राष्ट्रीय प्राण्याच्या शिकारीच परवानगी फक्त ट्रोफी हंटिंग कार्यक्रमांतर्गत देते. ट्रोफी हंटिंग पर्व 2018-19मध्ये आतापर्यंत देश-विदेशातील शिकाऱ्यांनी 50 जंगली जनावरांची शिकार केली आहे. गेल्या महिन्यातही या कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानच्या सर्वोच्च प्रजातीच्या मारखोर प्राण्याची शिकार केली होती. ज्यासाठी अमेरिकन नागरिकाला 1,05,000 आणि 1,00,000 डॉलरचं परमिट शुल्क मोजावे लागले आहेत. परमिट शुल्कामध्ये मिळालेली 80 टक्के रक्कम ही प्रशासन स्थानिकांना देत असते.

तसेच उर्वरित पैसा त्या जनावरांच्या देखभालीसाठी खर्च करण्यात येतो. स्थानिक लोकांना ही रक्कम जनावरांचं संरक्षण करण्यासाठी दिली जाते. तसेच जनावरांची शिकार करू नये, यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जातं. पाकिस्तान सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, हंटिंग ट्रोफी कार्यक्रमामुळे मारखोर प्राण्याची शिकार कमी झाली असून, त्यांची संख्या पहिल्यापेक्षा वाढली आहे. थायलंडचा अधिकृत आणि राष्ट्रीय पशू हत्ती आहे. तर मंगळवारी सियामीज फायटिंग फिशला त्यांनी राष्ट्रीय जलजीव घोषित केलं आहे. 

Web Title: US man pays record ₹78 lakh to hunt Pakistan's national animal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.