मसूद अजहरवर बंदी आणण्यासाठी चीनला अमेरिका, फ्रान्सने दिलं अल्टीमेटम 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 12:02 PM2019-04-12T12:02:55+5:302019-04-12T12:04:54+5:30

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी पुन्हा एकदा दबाव वाढत आहे

Ultimatum gave China by America, France on ban Masood Azhar | मसूद अजहरवर बंदी आणण्यासाठी चीनला अमेरिका, फ्रान्सने दिलं अल्टीमेटम 

मसूद अजहरवर बंदी आणण्यासाठी चीनला अमेरिका, फ्रान्सने दिलं अल्टीमेटम 

Next

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून पुन्हा एकदा पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी पुन्हा एकदा दबाव वाढत आहे. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी प्रक्रियेला वेग आला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेत मसूद अजहरवर बंदी आणण्यासाठी आणलेल्या प्रस्ताववरुन अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटेन यांनी चीनला तांत्रिक अडचणी हटविण्यासाठी सांगितले आहे. 

अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटेनने या तीन देशांनी मसूह अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. सुरक्षा परिषदेत 1267 प्रतिबंध समिती पुढील काही दिवसांत पुन्हा एकदा मसूद अजहरवरील बंदीचा प्रस्ताव आणणार आहे. एकीकडे मसूद अजहरच्या प्रकरणावर चीनसोबत चर्चा केली जात आहे. येत्या 23 एप्रिलपर्यंत चीनने मसूद अजहरवर बंदी आणण्याच्या प्रस्तावातील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात असं या देशांकडून सांगण्यात आलं आहे. 

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या मसूद अजहरचा समावेश काळ्या यादीत करण्यासाठी संयुक्त परिषदेत पुन्हा प्रस्ताव आणण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मसूद अजहरवर बंदी येऊ शकते. याशिवाय त्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई होऊ शकते. मसूदच्या परदेश यात्रांवरदेखील निर्बंध आणले जाऊ शकतात. 

महिनाभरापूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीने दहशतवादी मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला होता. व्हिटो पावरचा वापर करुन चीननेमसूद अजहरचा प्रस्ताव रोखून धरला होता. त्यावेळी चीनच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली. मात्र त्यानंतर चीनने मसूद अजहर प्रकरणावर लवकरच तोडगा काढू, या प्रस्तावाला आम्ही विरोध केला नसून आम्ही यावर चर्चा करत आहोत असं सांगितलं होतं. 

भारतामधील चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांनी सांगितलं होतं की, मसूद अजहर प्रकरण चीन लवकर तोडगा काढेल, हे प्रकरण तांत्रिक आहे आणि आम्ही मसूज अजहर प्रकरणावर चर्चा करत आहोत. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही लवकरच हे प्रकरण सोडवणार आहे. मसूद अजहरबाबत भारताकडून व्यक्त होत असलेली चिंता आम्हाला माहिती आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. 

संयुक्त राष्ट्र संघात चीनने घेतलेल्या भूमिकेवर भारत, अमेरिकेसह अनेक देशांनी नाराजी दाखवली. चीन जर या प्रकरणावर गंभीरतेने विचार करत नसेल तर आम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल असं अमेरिकेने सांगितले होते. त्यामुळे पुन्हा एकदा चीनवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे चीन काय भूमिका घेतं हे काही दिवसांत कळेल

Video - मसूद अजहरप्रकरणी लवकरच तोडगा काढू, चीनची भारताला ग्वाही

Web Title: Ultimatum gave China by America, France on ban Masood Azhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.