ट्रम्प यांच्यावर टीका, पुतीन यांच्या खोटेपणाला संधी दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 05:32 AM2018-07-18T05:32:31+5:302018-07-18T05:33:05+5:30

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या २०१६ च्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला होता या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्याला ट्रम्प यांनी पाठिंबा न दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

Trump gave an opportunity to criticize Putin's lies | ट्रम्प यांच्यावर टीका, पुतीन यांच्या खोटेपणाला संधी दिली

ट्रम्प यांच्यावर टीका, पुतीन यांच्या खोटेपणाला संधी दिली

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या २०१६ च्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला होता या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्याला ट्रम्प यांनी पाठिंबा न दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी हेलसिंकी येथील बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ट्रम्प त्या विषयावर गप्पच बसले.
रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जॉन मॅकेन म्हणाले की, पुतीन यांच्याबरोबरची ट्रम्प यांची बैठक ही घोडचूक होती. पुतीन यांच्या सुरात सूर मिसळून ते बोलत असल्याचे दिसत होते. खरेतर खोट्यानाट्या गोष्टी जगासमोर मांडण्यासाठी ही चांगली संधी मिळाली होती. हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजचे माजी सभापती न्यूट गिंग्रिच म्हणाले की, गुप्तचर यंत्रणांबद्दल ट्रम्प यांनी केलेल्या विधानांबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी केलेली ही सर्वात गंभीर चूक आहे. 

Web Title: Trump gave an opportunity to criticize Putin's lies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.