इसिसमुळे दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात

By Admin | Published: May 26, 2015 01:47 AM2015-05-26T01:47:30+5:302015-05-26T01:47:30+5:30

मध्य-पूर्वेतील सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाची स्थळे एका मागोमाग ताब्यात घेणाऱ्या इसिसमुळे एका दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.

This threatens the existence of rare birds | इसिसमुळे दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात

इसिसमुळे दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात

googlenewsNext

दमास्कस : मध्य-पूर्वेतील सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाची स्थळे एका मागोमाग ताब्यात घेणाऱ्या इसिसमुळे एका दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पामिरा हे सिरियामधील प्राचीन शहर इसिसने ताब्यात घेतल्यानंतर तेथे असणारी नॉदर्न बाल्ड इबिस या पक्ष्यांची अखेरची, उरलीसुरली वसाहत नष्ट होण्याची भीती तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत.
इसिसने गेल्याच आठवड्यामध्ये या शहराचा ताबा घेतल्यावर तेथील तीन पक्षी परागंदा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २००२ साली येथे त्यांचे प्रजनन स्थान आढळल्यावर त्यांचे संरक्षण सुरु झाले आहे. इबिस बाल्ड काळ््या रंगाचा आकाराने मोठा पक्षी असून त्याची चोचही लांब असते. एकेकाळी मध्य पूर्व, उत्तर अफ्रिका, मध्य युरोपात आढळणारा हा पक्षी आता हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच संख्येने उरला आहे. नामशेष होण्याच्या मार्गावरील या पक्ष्यांच्या प्रजातीला दहशतवादी आक्रमणाची झळ बसली आहे.
२००२ साली असे चार पक्षी पामिरा शहराजवळ सापडले होते. यातील तीन पक्षी गेल्या आठवड्यापासून एकाकी पडले आहेत. त्यांचे रक्षण करणारे रक्षक लढाई सुरू होताच पळून गेले. या पक्ष्यांचे भवितव्य अंधारात आहे. या पक्ष्यांपैकी चौथी पक्षीणही बेपत्ता असून तिच्या शोधासाठी १ हजार डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तिचे नाव झिनोबिया असे आहे.
लेबनॉनमधील निसर्ग संरक्षण संस्थेच्या मते झिनोबिया ही पक्षीण सापडणे फार महत्त्वाचे आहे. कारण याच पक्षिणीला हिवाळ्यात इथियोपियाला जाण्याचे मार्ग माहीत आहेत. तिच्याशिवाय राहिलेल्या तीन पक्ष्यांना बाहेर सोडता येणार नाही.
झिनोबिया नसताना या तीन पक्ष्यांना सोडल्यास ते जंगलात हरवतील व सिरियातून हा पक्षी नष्ट होईल.




बाल्ड इबिस हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. तो वाळवंट, खडकाळ भागात वाहत्या पाण्याजवळ आढळतो. हा दुर्मिळ पक्षी मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, दक्षिण व मध्य युरोप येथे आढळतो. त्याचे अवशेष १८ लाख वर्षांपूर्वीचे आहेत. युरोपमधून हा पक्षी ३०० वर्षांपूर्वी नाहीसा झाला असून आता अत्यंत दुर्मिळ समजला जातो.

इसिसने पामिरा शहर ताब्यात घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय चिंतित झाला आहे. पामिरा हे जागतिक वारसा असलेले शहर आहे. इस्लामिक स्टेटस्च्या जिहादींनी आधीच इराकमधील वास्तुशिल्पाचा खजिना असलेले निमरुद हे गाव नष्ट केले आहे.

Web Title: This threatens the existence of rare birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.