थेरेसा मे यांचा अखेर राजीनामा; ब्रेक्झिटचा तिढा कायमच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:55 AM2019-06-08T03:55:57+5:302019-06-08T03:56:16+5:30

ब्रिटनमध्ये नव्या पंतप्रधानाचा शोध सुरू

In Theresa May finally resign; The rest of the stay | थेरेसा मे यांचा अखेर राजीनामा; ब्रेक्झिटचा तिढा कायमच

थेरेसा मे यांचा अखेर राजीनामा; ब्रेक्झिटचा तिढा कायमच

Next

लंडन : ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर यशस्वी तोडगा काढण्यात अयशस्वी ठरलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या पदाचा शुक्रवारी राजीनामा दिला. नव्या पंतप्रधानाची निवड होईपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहतील.

पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याबरोबरच त्यानी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट कराराच्या मुद्द्यावर ब्रिटनच्या पार्लमेंटमधील खासदारांचा पाठिंबा मिळवण्यात थेरेसा मे अयशस्वी ठरल्या होत्या. ब्रेक्झिट कराराला पार्लमेंटची मंजूरी मिळविण्याचे मे यांनी तीनदा केलेले प्रयत्न फोल ठरले होते.

ब्रिटनमध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे सरकार आहे. मे यांच्या राजीनाम्यामुळे नवीन पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया वेग घेईल. ब्रेक्झिटच्या प्रश्नावर २०१६ साली सार्वमत घेण्यात आले होते. युरोपियन युनियनमधून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या बाजूने ५२ टक्के ब्रिटिश जनतेने कौल दिला होता. जुलै २०१६मध्ये डेव्हिड कॅमेरून यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाची सूत्रे थेरेसा मे यांनी स्वीकारली होती.

करार पूर्ण न केल्याची खंत
पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा विचार असल्याचे थेरेसा मे यांनी २४ मे रोजी जाहीर केले होते. तो विचार त्यांनी शुक्रवारी कृतीत आणला. ब्रेक्झिट करार पूर्ण करू शकले नाही ही आयुष्यभर खंत राहील असे उद्गार थेरेसा मे यांनी काढले होते. त्या इंग्लंडच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या.

Web Title: In Theresa May finally resign; The rest of the stay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.