कोरोनामुळे आत्महत्या, चीनमध्ये भारतीय तरुणालाही मृत्यूने गाठले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:19 AM2023-01-03T08:19:59+5:302023-01-03T08:20:21+5:30

तामिळनाडूतील अब्दुल शेख हा  २२ वर्षीय तरुण चीनमध्ये वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत होता. मृत्यूचे कारण काही आजार असल्याचे सांगितले जात असले तरी तो कोरोनाचा बळी ठरला असावा, असा अंदाज आहे.

Suicide due to Corona, Indian youth also died in China | कोरोनामुळे आत्महत्या, चीनमध्ये भारतीय तरुणालाही मृत्यूने गाठले

कोरोनामुळे आत्महत्या, चीनमध्ये भारतीय तरुणालाही मृत्यूने गाठले

Next

बीजिंग : चीन सरकारने कोरोनाची स्थिती कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी ती अनियंत्रित झाल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. आता तर कोरोनामुळे चिनी नागरिक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. दरम्यान, एका भारतीय तरुणालाही कोरोनाने मृत्यूच्या दारात पोहोचवले आहे.

तामिळनाडूतील अब्दुल शेख हा  २२ वर्षीय तरुण चीनमध्ये वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत होता. मृत्यूचे कारण काही आजार असल्याचे सांगितले जात असले तरी तो कोरोनाचा बळी ठरला असावा, असा अंदाज आहे. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे मदत मागितली आहे.

आजारी पडल्यानंतर अब्दुलला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा जीव वाचू शकला नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत एक व्यक्ती इमारतीच्या छतावरून आत्महत्या करताना दिसत आहे. चीनमध्ये कोरोनामुळे लोक आत्महत्या करत असल्याचा झेंगचा दावा आहे.

हाँगकाँगचाही अजब निर्णय
चीनमधील परिस्थिती आटोक्याबाहेर जात असताना हाँगकाँग ८ जानेवारीपासून चीनसोबतची सीमा उघडणार आहे. यासोबतच प्रवाशांसाठी अनिवार्य विलगीकरणही रद्द करण्यात येणार आहे. 

जगात ६६ कोटींवर बाधित 
कोरोना वर्ल्डोमीटरनुसार, जगात आतापर्यंत ६६ कोटी ५२ लाख ९ हजार ९६४ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ६६ लाख ९७ हजार ९२२ मृत्यू झाले आहेत.

५०० बळी ब्रिटनमध्ये आठवड्याला 
द गार्डियनच्या वृत्तानुसार, रॉयल कॉलेज ऑफ इमर्जन्सी मेडिसिनचे डॉ. एड्रियन बॉयल म्हणतात, की ब्रिटनमध्ये कोरोनामुळे दर आठवड्याला ३०० ते ५०० लोक मरत आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने हा प्रकार घडत आहे. 
 

Web Title: Suicide due to Corona, Indian youth also died in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.