भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण करारावर स्वाक्षरी

By admin | Published: August 31, 2016 04:18 AM2016-08-31T04:18:44+5:302016-08-31T04:18:44+5:30

अमेरिका आणि भारत यांच्यातील संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे या दोन देशांच्या लष्करांमध्ये सैन्य हालचालींबाबत एकमेकांना पाठिंबा मिळेल मात्र लष्करी तळ उभारता येणार नाही

Signature on Indo-US conservation agreement | भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण करारावर स्वाक्षरी

भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण करारावर स्वाक्षरी

Next

वॉशिंग्टन : अमेरिका आणि भारत यांच्यातील संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे या दोन देशांच्या लष्करांमध्ये सैन्य हालचालींबाबत एकमेकांना पाठिंबा मिळेल मात्र लष्करी तळ उभारता येणार नाही, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि अ‍ॅश्टन कार्टर यांनी सांगितले.
उभय देशांत लॉजिस्टिक एक्स्चेंज मेमोरंडम आॅफ अ‍ॅग्रिमेंटवर सोमवारी स्वाक्षऱ्या झाल्यानंतर पर्रीकर व कार्टर यांनी ही माहिती दिली. भारतात कोणत्याही प्रकारचा तळ उभारणे किंवा तशा प्रकारचा उपक्रम चालविण्याची तरतूद करारात नाही, असे पर्रीकर म्हणाले.
या करारानुसार भारत आणि अमेरिका यांना सैन्याचा पाठिंबा, पुरवठा आणि सेवा पुन्हा मिळविण्याच्या तत्वावर व त्याची अमलबजावणी करण्यास निश्चित कालावधी उपलब्ध होईल. यात अन्न, पाणी, वाहतूक, पेट्रोलियम, तेल, वंगणे, कपडे, वैद्यकीय सेवा, सुटे भाग व घटक, दुरूस्ती, प्रशिक्षण आणि देखरेख सेवेचा अंतर्भाव आहे. शिवाय इतर व्युहारचनात्मक गोष्टी व सेवांचाही समावेश त्यात आहे. एकमेकांच्या विमानांच्या तुकड्यांना व्युहात्मक पाठिंबा देणे, इंधनाचा पुरवठा करणे आदींचा त्यात समावेश असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारताची अमेरिकेसोबतची आघाडी ही चीन,पाकिस्तान एवढेच काय रशियालाही खिजवू शकते व भारत अशियात भूराजकीय शत्रुत्वाचे केंद्र बनून स्वत:ला सैनिकी डावपेचांच्या दृष्टीने ‘त्रास’ करून घेत आहे, असे मतचीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने व्यक्त केले.
भारत अमेरिकेच्या बाजुने झुकल्यास तो स्वत:चे व्यूहरचनात्मक स्वातंत्र्य गमावून बसेल. अमेरिकेतील प्रसार माध्यमांनी मात्र या कराराचे स्वागतही केले.

Web Title: Signature on Indo-US conservation agreement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.