२३ वर्षीय वकिलाने ९१ वर्षीय वृध्देशी केला विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 02:50 PM2017-11-03T14:50:24+5:302017-11-03T15:12:31+5:30

आपल्यापेक्षा बरीच वर्ष मोठ्या असलेल्या आपल्या काकीशी त्याने लग्न करुन संसार मांडला.

shocking 23-years-old advocate married 91 year old widow | २३ वर्षीय वकिलाने ९१ वर्षीय वृध्देशी केला विवाह

२३ वर्षीय वकिलाने ९१ वर्षीय वृध्देशी केला विवाह

Next
ठळक मुद्देते दोघे गेल्या आठ वर्षांपासून एकत्र राहत होते.तिने त्याच्याकडून वचन घेतलं होतं की आधी शिक्षण पुर्ण करायचं आणि मगच नोकरी करायचीहा तरुण स्वत: कायदा आणि विधी विषयाचा विद्यार्थी आहे.

अर्जेंटीना : ९१ वर्षीय काकीची शेवटची इच्छा म्हणून २३ वर्षीय तरुणाने त्यांच्यासोबत लग्न केल्याची आश्चर्यकारक घटना अर्जेटिना येथून समोर आली आहे. एवढेच नव्हे तर त्या तरुणाने आता पत्नीच्या मृत्यूपश्चात मिळणाऱ्या पेन्शनसाठीही अर्ज केला आहे. मुख्य म्हणजे तरुण स्वत: कायदा आणि विधी विषयाचा विद्यार्थी असला तरी त्याला पेन्शन नाकारण्यात आली आहे. 

 मॉरिसिओ ओसोला असे या तरुणाचे नाव असून योलांडा असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे. २०१५च्या फेब्रुवारी महिन्यात त्यांनी लग्न केलं होतं. मात्र त्याच्या काही महिन्यातच योलांडा याचं निधन झालं. त्यामुळे त्यांच्या पश्चात विधुराला मिळणारं पेन्शन मिळावं याकरता ओसोला यांनी अर्ज केला होता, मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. शोध पथकाने अधिक चौकशी केली असता त्यांच्या शेजाऱ्यांना या लग्नाबद्दल काहीच माहित नव्हतं. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे कोणतेच पुरावे नसल्याने ओसोला या तरुणाला पेन्शन मिळण्याची फार कमी शक्यता आहे.

नॉर्थ-वेस्ट अर्जेंटीना येथील सालटा या शहरात राहत असलेल्या मोरिसिओ म्हणतो की,‘आमच्यात वयाचे अंतर असलं तरी एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीवर ज्याप्रमाणे प्रेम करेल त्याचप्रमाणे मीपण योलांडा यांच्यावर केलं होतं. योलांडा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. तसंच आमचं लग्न व्हावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती, त्यामुळे आम्ही लग्न केलं.’

तो पुढे म्हणतो की, ‘योलांडा याचं वय निश्चितच जास्त होतं. मात्र त्या फार स्पष्टव्यक्त्या होत्या. म्हणून त्यांनी माझ्याकडे थेट लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. लग्नामध्ये काही कायदेशीर अडचणी येतील असंही त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे आम्ही लग्न केलं तेव्हाही मी यासंबंधीत असलेल्या कायद्याचा अभ्यास करत होतो.’ 

मोरिसिओ आणि योलांडा हे गेल्या आठ वर्षांपासून एकत्र राहत होते, कारण मोरिसिओच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतल्यानंतर त्याचा संपूर्ण सांभाळ योलांडा यांनी केला. त्यानंतर तो बरेच वर्ष शिकत होता. मोरिसिओ आणि योलांडा याचं लग्न झालं तेव्हाही तो शिकतच होता. त्यामुळे त्याच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नव्हते. शिवाय योलांडा यांनीही वचन दिलं होतं की आधी शिक्षण पुर्ण करायचं आणि मगच नोकरी करायची, त्यामुळे मोरिसिओ हा पूर्णत: योलांडाला मिळणाऱ्या वेतननिवृत्तीवर अवलंबून होता.

मात्र आता तिचं निधन झाल्यामुळे तिची पेन्शनही बंद झाल्याने मोरिसिओ याने पत्नीच्या मृत्यूपश्चात मिळणाऱ्या पेन्शनसाठी अर्ज केला. मात्र शेजाऱ्यांनी सांगितलेल्या पुराव्यानुसार समाजसेवा टीमने त्याचा अर्ज  फेटाळला. मात्र तो आजही कायदेशीररित्या पेन्शनसाठी आग्रही आहे. ज्या पुरुषांचा अर्थजन नाही त्यांना त्यांच्या पत्नीच्या मृत्यूपश्चात पेन्शन मिळायला हवी, यासाठी त्याने लढा सुरू केला आहे. 

Web Title: shocking 23-years-old advocate married 91 year old widow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.