१९७६ पासून राणी एलिझाबेथ वापरत होत्या ई-मेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 06:43 AM2022-09-18T06:43:00+5:302022-09-18T06:44:17+5:30

आधुनिक तंत्रज्ञानाचा आवर्जून उपयोग

Queen Elizabeth had been using e-mail since 1976 | १९७६ पासून राणी एलिझाबेथ वापरत होत्या ई-मेल

१९७६ पासून राणी एलिझाबेथ वापरत होत्या ई-मेल

Next

लंडन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या कारभारात वापर करण्याची आवड होती. जगाला ज्यावेळी ई-मेलबद्दल फारसे माहीत नव्हते, त्या काळात १९७६मध्ये एलिझाबेथ यांनी ब्रिटनच्या माल्व्हर्न येथे रडार उभारणीबाबत त्यांचा पहिला ई-मेल पाठविला होता.
त्यांच्या तंत्रज्ञान प्रेमाबद्दलच्या अनेक आठवणी ब्रिटन व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. राणी एलिझाबेथ या स्वत: संगणकावर बसून कधीही ई-मेल लिहित नसत. त्या ई-मेलचा मजकूर सहायकाला तोंडी सांगत असत. राणी एलिझाबेथ यांना १९७६ साली त्यांचे ई-मेल अकाऊंट उघडण्यासाठी ब्रिटनमधील संगणकतज्ज्ञ पीटर किर्सेटिन यांनी मदत केली होती.  त्यांच्यामुळेच राणी एलिझाबेथ इंटरनेटचाही वापर करू लागल्या. त्यासाठी त्यांनी एचएमई २ असे नाव वापरले होते. एचएमई २चे पूर्ण रूप हर मॅजेस्टी एलिझाबेथ २ असे आहे. 

ट्विटर, इन्स्टाग्रामवरही होते अकाऊंट 
राणी एलिझाबेथ यांचे तंत्रज्ञानप्रेम केवळ ई-मेल पाठविण्यापुरते मर्यादित नव्हते. १९९७ साली राणी एलिझाबेथ यांनी ब्रिटनच्या राजघराण्याच्या वेबसाईटचे उदघाटन केले होते. ब्रिटनच्या राजघराण्याचा यूट्यूब चॅनेल डिसेंबर २००७मध्ये सुरू झाला. त्याचे आता ९ लाख ७३ हजार सबस्क्राईबर आहेत. राणी एलिझाबेथ यांचे ट्विटर व इन्स्टाग्रामवरही अकाऊंट होते.

Web Title: Queen Elizabeth had been using e-mail since 1976

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.