लॅण्डिंग करताना विमान थेट नदीत गेले, अमेरिकेतील चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:27 AM2019-05-05T06:27:19+5:302019-05-05T06:27:40+5:30

क्युबा येथून उत्तर फ्लोरिडासाठी उड्डाण केलेले विमान जॅक्सनविले या एअर स्टेशनवर उतरत असताना अपघातग्रस्त झाले.

 The plane went directly into the river while landing, wonders in America | लॅण्डिंग करताना विमान थेट नदीत गेले, अमेरिकेतील चमत्कार

लॅण्डिंग करताना विमान थेट नदीत गेले, अमेरिकेतील चमत्कार

Next

फ्लोरिडा : क्युबा येथून उत्तर फ्लोरिडासाठी उड्डाण केलेले विमान जॅक्सनविले या एअर स्टेशनवर उतरत असताना अपघातग्रस्त झाले. हे विमान धावपट्टी संपल्यानंतर विमान कमी पाणी असलेल्या नदीत जाऊन पडले. १४३ प्रवासी असलेल्या या विमानातील एकाही प्रवाशाला काहीही दुखापत झाली नाही.
क्युबाच्या नौसेनेच्या ग्वांतानामो बे या विमानतळावरून १३६ प्रवासी आणि चालकांसह ७ कर्मचाऱ्यांंना घेऊन बोईंग ७३७ विमान फ्लोरिडा येथील नेव्हल एअर स्टेशन जॅक्सनविले येथे उतरणार होते. त्यावेळी विमान धावपट्टीवरून घसरून सेंट जॉन्स या नदीत पडले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. २१ प्रवाशांना किरकोळ तपासण्यासांठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. समुद्री विभागाचे पथक दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी गेले. तसेच अग्निशमन आणि मदत कार्य विभागाचे ९० कर्मचारीही तातडीने घटनास्थळी पोहचले.
शुक्रवारी रात्री झालेल्या दुर्घटनेबद्दल नेव्हल एअर स्टेशन जॅक्सनविले यांच्यातर्फे एक निवेदन जारी करण्यात आले आहे. जॅक्सनविले शेरिफ कार्यालयाने ‘व्टिटर’वर मदत कार्याची माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी पोस्ट केलेल्या छायाचित्रामध्ये विमानावर मियामी एअर इंटरनॅशनलचा लोगो दिसत आहे. विमान धावपट्टीच्या बाहेर कसे गेले, याचे कारण अद्याप समजलेले नाही. (वृत्तसंस्था)

इंधनाचा प्रवाह थांबवला
च्कॉनर म्हणाले, सगळे जण बचावले आहेत. मला वाटते, हा एक चमत्कारच आहे. विमान नदीतून बाहेर काढण्यास किती वेळ लागेल, याविषयी सांगता येणार नाही. मात्र, विमान नदीच्या तळाशी स्थिर दिसत आहे. तेथून ते दूर जाण्याची शक्यता कमी आहे. विमान नदीत पडल्यानंतर चालकांच्या गटाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी इंधनाचा प्रवाह थांबविण्याचे काम सुरु केले.

Web Title:  The plane went directly into the river while landing, wonders in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात