पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं हाफीज सईदच्या पक्षावर बंदी घालण्याची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 09:03 PM2017-09-29T21:03:05+5:302017-09-29T21:29:55+5:30

पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं निवडणूक आयोगाकडे हाफिज सईद याच्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Pakistan's Home Ministry asked the ban on Hafiz Saeed's party | पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं हाफीज सईदच्या पक्षावर बंदी घालण्याची केली मागणी

पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं हाफीज सईदच्या पक्षावर बंदी घालण्याची केली मागणी

Next

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं निवडणूक आयोगाकडे हाफिज सईद याच्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 2008मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्या डोक्यावर अमेरिकेनं 1 कोटी अमेरिकी डॉलरच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.

22 सप्टेंबरला पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं निवडणूक आयोगाकडे लष्कर ए तोय्यबाशी संबंधित नव्या स्थापलेला राजकीय पक्ष मिल्ली मुस्लिम लीगला अधिकृतरीत्या पक्ष म्हणून मान्यता न देण्याची मागणी केली आहे. लष्कर-ए-तोय्यबानं 2008मध्ये मुंबई दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. त्या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता. दोन पानांच्या पत्रात गृहमंत्रालयानं लिहिलं आहे की, मिल्ली मुस्लिम लीगच्या रजिस्ट्रेशनचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी पाकिस्तान गृहमंत्रालयाकडून अशा आशयाचं पत्र मिळाल्याचं उघड केलं आहे.

जमात- उद- दावाचा म्होरक्या हाफिज सईदला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. अमेरिका हाफिज सईदला 2008च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड समजते. तसेच त्यासंदर्भात माहिती देणा-या व्यक्तीला 1 कोटी डॉलरपर्यंत बक्षीसही देण्यात येणार आहे. हाफिज सईद सध्या पाकिस्तानमध्ये स्वतःच्या घरात नजरकैदेत आहे. हाफिज सईदमुळे भारत आणि अमेरिकेशी पाकिस्तानचे संबंध बिघडले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्ताननं अखेर दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने लाहोर हायकोर्टात यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. हाफिज सईदचा दहशतवाद आणि दहशवादी कारवायांशी संबंध असल्याचं या प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे मांडण्यात आले आहे.  "हाफिज सईदला काही महिन्यांपासून अवैधरित्या कैदेत ठेवण्यात येत आहे", अशी याचिका जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेनं कोर्टात दाखल केली होती. यावर पाकिस्तान सरकारने कोर्टात सांगितले की, "हाफिज सईदविरोधात अशांतता पसरवण्याबाबत पुरेस पुरावे प्राप्त आहेत. शिवाय त्याच्याविरोधात दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे".

कुख्यात दहशतवादी आणि 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईदला 30 जानेवारीपासून लाहोर येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिका प्रवेश बंदी घालण्यात आल्यानंतर या यादीत आगामी काळात पाकिस्तानाचाही समावेश होणार असल्याचे अमेरिकेकडून देण्यात आले होत. या निर्णयामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचं दिसून आले होते.  यावर "राष्ट्रहितासाठी घेण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयांतर्गत हाफिज सईदवर नजरकैदेची कारवाई करण्यात आली आहे", असा कांगावा पाकिस्तानी सैन्याने केला होता.  शिवाय या निर्णयाला पाकिस्तानची कमजोरी समजू नका, अशा फुशारक्याही पाकिस्ताननं मारल्या होत्या. दरम्यान, अमेरिकेनं हाफिज सईदचा मोस्ट वॉटेंड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केल होता. शिवाय त्याच्या अटकेसाठी मदत करणा-या व्यक्तीला एक कोटी डॉलरचे बक्षीसही घोषित केले होते. 

Web Title: Pakistan's Home Ministry asked the ban on Hafiz Saeed's party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.