भारतीयांपेक्षा पाकिस्तानी नागरिकांचे अच्छे दिन!, बांगलादेश, भूतान हे देशही अधिक आनंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:58 AM2018-03-16T01:58:35+5:302018-03-16T01:58:35+5:30

दहशतवादी संघटनांचे माहेरघर, सातत्याने होणारे हल्ले यांमुळे पाकिस्तान बदनाम असला तरी तेथील नागरिक भारतीयांपेक्षा अधिक सुखी आणि आनंदी असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालातून समोर आले आहे.

Pakistanis better days than Bangladeshis, Bangladesh, Bhutan, the country is more happy | भारतीयांपेक्षा पाकिस्तानी नागरिकांचे अच्छे दिन!, बांगलादेश, भूतान हे देशही अधिक आनंदी

भारतीयांपेक्षा पाकिस्तानी नागरिकांचे अच्छे दिन!, बांगलादेश, भूतान हे देशही अधिक आनंदी

Next

नवी दिल्ली : दहशतवादी संघटनांचे माहेरघर, सातत्याने होणारे हल्ले यांमुळे पाकिस्तान बदनाम असला तरी तेथील नागरिक भारतीयांपेक्षा अधिक सुखी आणि आनंदी असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालातून समोर आले आहे. सर्वात आनंदी देश फिनलँड ठरला आहे. भारतापेक्षा बहुतांश शेजारी देशही अधिक आनंदी व खूश असल्याचे अहवालात म्हटले आहे.
दरवर्षी ‘वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट’ प्रसिद्ध करण्यात येतो. सामाजिक सद्भाव, भ्रष्टाचार व लोकांच्या अपेक्षा अशा मुद्द्यांचा विचार करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. १५६ आनंदी देशांच्या यादीत भारत १३३ व्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान या यादीत ७५ व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे बांगलादेश, भूतानसारखी शेजारी राष्ट्रेही भारतापेक्षा अधिक आनंदी असल्याचे यात म्हटले आहे. क्रमवारीत नेपाळ, चीन आणि श्रीलंकादेखील भारताच्या पुढे आहेत.
>१0 स्वस्त शहरांत भारतातील तीन
जगातील १0 स्वस्त शहरांमध्ये भारतातील बंगळुरू, चेन्नई व दिल्ली या शहरांचा समावेश आहे. एका सर्व्हेमध्ये हे आढळून आले आहे. इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने केलेल्या सर्वेक्षणात सिंगापूर हे सर्वात महागडे शहर असल्याचे दिसून आले आहे. बंगळुरू पाचव्या तर चेन्नई आठव्या स्थानावर असून, दिल्ली शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे. जगातील सर्वात स्वस्त शहर आहे सिरियाची राजधानी असलेले दमास्कस. बंगळुरू पाचव्या तर चेन्नई आठव्या स्थानावर असून, दिल्ली शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे. दुसऱ्या व तिसºया स्थानावर व्हेनेझुएलाची राजधानी काराकस व कझाकिस्तानची राजधानी अलमाटी यांचा क्रमांक लागतो. लागोस शहर चौथ्या व पाकिस्तानमधील कराची सहाव्या क्रमांकावर आहे. अल्जिअर्स व बुखारेस्ट ही शहरे सातव्या व नवव्या क्रमांकावर आहेत.
11 क्रमांकांनी झाली घसरण
२०१७ मधील ‘वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट’मध्ये भारताची चार क्रमांकांनी घसरण झाली होती. यंदा भारत ११ क्रमांकांनी घसरला आहे.
>फिनलँड सर्वाधिक आनंदी कशामुळे?
फिनलँडमधील आनंदामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हेलसिंकी येथील सोफिया होल्म (२४) म्हणाल्या की, फिनलँडमधील राजकारण आणि अर्थकारण खूपच सकारात्मक आणि चांगले आहे. त्यामुळे देशात सुखी जीवनासाठी अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे येथील लोक आनंदी आहेत.

Web Title: Pakistanis better days than Bangladeshis, Bangladesh, Bhutan, the country is more happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.