पाकिस्तान अतिरेक्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान - ओबामा

By admin | Published: January 13, 2016 10:56 AM2016-01-13T10:56:02+5:302016-01-13T14:13:36+5:30

पाकिस्तान, अफगाणिस्तानसह जगातील अनेक भागांमध्ये पुढची काही दशके अस्थिरता कायम राहील असे बराक ओबामा म्हणाले.

Pakistan safe haven for terrorists - Obama | पाकिस्तान अतिरेक्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान - ओबामा

पाकिस्तान अतिरेक्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान - ओबामा

Next

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. १३ -  पाकिस्तान, अफगाणिस्तानसह जगातील अनेक भागांमध्ये पुढची काही दशके अस्थिरता कायम राहील. अफगाणिस्तान, पाकिस्तान हे देश नव्या दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित आश्रय स्थाने ठरु शकतात  असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बुधवारी म्हणाले. 
राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेला उद्देशून केलेल्या शेवटच्या भाषणात त्यांनी दहशतवादापासून अमेरिकेला असलेल्या धोक्याकडे लक्ष वेधले. आज अमेरिकेला इसिस आणि अलकायदा या दोन अतिरेकी संघटनांपासून थेट धोका आहे. आजच्या जगात दहशतवाद्यांसाठी मानवी जीवनाचे अजिबात मूल्य नसल्याचे त्यांनी सांगितले. 
आपले परराष्ट्र धोरण इसिस आणि अलकायदा यांना रोखण्याच्या दिशेने असले पाहिजे. इसिस संघटना नसती तरी, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मिडल इस्ट आणि अन्य काही देशांमध्ये अस्थिरता कायम राहिली असती. पाकिस्तान, अफगाणिस्तान हे भाग अतिरेक्यांसाठी सुरक्षित तळ ठरु शकतात या धोक्याकडेही ओबामांनी लक्ष वेधले. 
 
बराक ओबामा यांच्या भाषणातील मुद्दे 
आजच्या घडीला अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातील मजबूत अर्थव्यवस्था आहे.
६० वर्षांपूर्वी अवकाश शर्यतीत रशियाने आपल्यावर मात केली, आपण स्पुटनिक अवकाशात गेल्याचे नाकारले नाही, आपण विज्ञानावरुन वाद घातला नाही.
यावर्षी आपण एकत्र गुन्हेगारी न्याय सुधारणांसारख्या विषयांवर प्राधान्याने काम करुया.
सामाजिक सुरक्षा आणि वैद्यकीय उपचार आज महत्वाचे आहेत, आपण ते कमकुवत करण्याऐवजी अधिक मजबूत करुया.
स्थालांतरीतांचे प्रश्न, समान वेतन, भरपगारी रजा,किमात वेतनात वाढ आणि बंदुकीच्या हिंसाचारापासून मुलांचे संरक्षण याविषयावर मी काम केले आणि करत राहीन.
अडचणीत सापडलेल्या प्रत्येक देशाची आपण पूर्नउभारणी करु शकत नाही, जागतिक चिंतेचे जे विषय आहेत त्यावर आपल्यासोबत काम करण्यासाठी आपण जगाला एकत्र करु.
आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आपण अधिक चांगले शिक्षक नेमले पाहिजे आणि त्यांना सहकार्य केले पाहिजे.
आणखी वर्षभराने मी राष्ट्राध्यक्ष नसेन, सर्वसामान्य नागरीक म्हणून तुमच्यासोबत असेन.
 
 

Web Title: Pakistan safe haven for terrorists - Obama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.