एअर स्ट्राइकची 'सच्चाई' लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:21 PM2019-03-08T17:21:03+5:302019-03-08T17:24:09+5:30

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केली. मात्र, पाकिस्तान ही कारवाई जगासमोर येऊ नये म्हणून धडपडत आहे.

pakistan continues blocking media access to jaba madrasa where iaf air strike the jaish terror camp | एअर स्ट्राइकची 'सच्चाई' लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड

एअर स्ट्राइकची 'सच्चाई' लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड

ठळक मुद्देभारताने केलेली कारवाई जगासमोर येऊ नये म्हणून पाकिस्तानची धडपड.पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी भारताने हल्ला केला. त्या ठिकाणी पाकिस्तानचे सुरक्षा अधिकारी मीडियाला जाऊ देत नाही आहेत. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केली

जाबा (पाकिस्तान) : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केली. मात्र, पाकिस्तान ही कारवाई जगासमोर येऊ नये म्हणून धडपडत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी भारताने हल्ला केला. त्या ठिकाणी पाकिस्तानचे सुरक्षा अधिकारी मीडियाला जाऊ देत नाही आहेत. त्या ठिकाणी जाण्यास मीडियाला बंदी घालण्यात आली आहे.

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या एका टीमला गुरुवारी याचा अनुभव आला.. भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईत भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटमधील 'जैश-ए-मोहम्मद' दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष केले होते. याठिकाणी जाण्यास पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मीडिया टीमला जाण्यास विरोध करण्यात आला. 

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. 

Web Title: pakistan continues blocking media access to jaba madrasa where iaf air strike the jaish terror camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.