पाकिस्ताननं 5 वर्षांत 298 भारतीयांना दिलं नागरिकत्व, पाकिस्तानच्या केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 03:43 PM2017-08-20T15:43:56+5:302017-08-20T15:50:54+5:30

भारतानं गेल्या 5 वर्षांत 298 भारतीयांना नागरिकत्व बहाल केल्याची माहिती पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं दिली

Pak grants nationality to 298 Indians in 5 years: Ministry | पाकिस्ताननं 5 वर्षांत 298 भारतीयांना दिलं नागरिकत्व, पाकिस्तानच्या केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती

पाकिस्ताननं 5 वर्षांत 298 भारतीयांना दिलं नागरिकत्व, पाकिस्तानच्या केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती

Next

इस्लामाबाद, दि. 20 - भारतानं गेल्या 5 वर्षांत 298 भारतीयांना नागरिकत्व बहाल केल्याची माहिती पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं दिली आहे. 2012पासून 14 एप्रिल 2017पर्यंत 298 भारतीयांना पाकिस्तानी नागरिकत्व देण्यात आलं आहे. सत्ताधारी पार्टी PML-Nचे खासदार शेख रुहेल असगर यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला पाकिस्तानचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी उत्तर दिले, त्यावेळी ही माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानचं स्थानिक वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, 2012मध्ये 48 भारतीयांना पाकिस्तानचं नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे. 2013मध्ये 75 आणि 2014मध्ये जवळपास 76 लोकांना नागरिकत्व मिळालं आहे. 2015मध्ये 15 भारतीय व्यक्तींना पाकिस्ताननं नागरिकत्व बहाल केलं आहे. तसेच 2016मध्ये 69 लोकांना पाकिस्तानी नागरिकत्व देण्यात आलं आहे. 2017मध्ये 14 एप्रिलपर्यंत 15 भारतीय प्रवाशांना पाकिस्तानी नागरिकत्व मिळालं आहे.  गेल्या वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी एका भारतीय महिलेला पाकिस्तानी नागरिकत्व दिलं होतं. त्या महिलेच्या पतीनं निधन झालं आहे. महिलेनं 2008मध्ये पाकिस्तानी नागरिकत्व मिळवण्याचा अर्ज केला होता. तेव्हापासून तिचा अर्ज प्रलंबित होता. महिलेनं ब-याच काळापूर्वी पाकिस्तानी व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. पतीच्या निधनानंतर महिलेच्या सावत्र पुत्रानं दिला संपत्तीतून बेदखल केलं होतं. 

गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातल्या 114 लोकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. नंदलाल मेघानी, डॉ. विशनदास मनकानी आणि किशनलाल अडानी यांचाही भारतीय नागरिकत्व मिळालेल्या व्यक्तींमध्ये समावेश होता. या पाकिस्तानी नागरिकांना भारताच्या नागरिकत्वाचं प्रमाणपत्र बहाल करण्यात आलं. 
अहमदाबादचे 50 वर्षीय नंदलाल मेघानी 16 वर्षांपूर्वीच पाकिस्तानातील सिंध प्रांतातून पत्नी आणि मुलीसह भारतात आले. भारतात नवी सुरुवात करण्यासाठी त्यांनी तिथलं घर आणि व्यवसाय विकून टाकला. आम्ही भारतात सामान्य नागरिक जगत असलेल्या राहणीमानामुळे प्रभावित झालो होतो. त्यामुळेच आम्हाला भारतीय नागरिकत्व मिळावं, यासाठी सरकारकडे अर्ज केला होता, असंही नंदलाल मेघानी यांनी सांगितलं होतं. पाकिस्तानातील वाढत्या गुन्हेगारीमुळे आम्हाला भारतात शरण यावं लागलं. पाकिस्तानात वाढत चाललेल्या दहशतवाद्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या मुस्लिम मित्रांनी मला भारतात स्थायिक होण्याची सूचना केली होती. मेघानी हे पाकिस्तानमध्ये ऑटो पार्ट्सचा व्यवसाय करत होते. 

आणखी वाचा 
"पाकिस्तानला धडा शिकवणार", शहिदाच्या मुलीचा निर्धार
"तो" चहावाला पाकिस्तानी नाही; जियो न्यूजचा दावा
उस्मानाबादमध्ये चीन, पाकिस्तानच्या ध्वजाची होळी

तर पाकिस्तानमधून आलेले 59 वर्षीय किशनलाल अडानी म्हणाले, मी 2005मध्ये पत्नी आणि 4 मुलांसह भारतात आलो. अडानी हे सिंध प्रांतातील एक दुकान चालवत होते. भारतात आल्यावर मुलांना हाताशी घेऊन त्यांनी भांड्यांचं दुकान सुरू केलं. मला आतासुद्धा त्या घराची आणि मित्रांची आठवण येते. मात्र पाकिस्तानात वाढत असलेल्या दहशतवादामुळे तिथं आमचं वाचणं जवळपास मुश्कील होतं. ज्यावेळी आम्ही बाहेर पडत होते, तेव्हा परत घरी येऊ की नाही, हाच प्रश्न सतावत असे, असंही अडानी म्हणालेत. पाकिस्तानपेक्षा भारत हा सुरक्षित आणि विकसित देश आहे, असं डॉ. विशनदास मनकानी यांनी सांगितलं आहे. विशनदास मनकानी हे 2001 रोजी स्वतःच्या 4 मुलांसह भारतात आले. मला आणि माझ्या पत्नीला 2016 रोजी भारतीय नागरिकत्व मिळालं. आम्ही भारताचा विकास पाहून अचंबित झालो आहोत. पाकिस्तानात असा विकास कुठेच दिसत नाही. भारतातील सुरक्षित वातावरण आम्हाला भारतात घेऊन आलं आहे, असंही मनकानी यांनी सांगितलं होतं.

Web Title: Pak grants nationality to 298 Indians in 5 years: Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.