धक्कादायक! बॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबत 'ती' महिनाभर एकाच घरात राहिली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 11:08 PM2019-04-09T23:08:44+5:302019-04-09T23:09:50+5:30

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ; पोलिसांकडून महिलेला अटक

Michigan Woman Held For Living With Dead Boyfriend For a Month | धक्कादायक! बॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबत 'ती' महिनाभर एकाच घरात राहिली

धक्कादायक! बॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबत 'ती' महिनाभर एकाच घरात राहिली

googlenewsNext

मिशिगन: प्रियकराच्या मृतदेहासोबत महिनाभर एकाच घरात वास्तव्य करत असलेल्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली. अमेरिकेच्या मिशिगनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराच्या कुटुंबानं पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. 

एँजेला शॉक या 49 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली. एँजेला तिच्या 61 वर्षीय प्रियकरासोबत राहात होती. महिन्याभराआधी त्याचा मृत्यू झाला. मात्र तिनं याबद्दलची माहिती कोणालाही दिली नाही. जवळपास महिनाभर ठावठिकाणी न समजल्यानं प्रियकराचे कुटुंबीय पोलिसांकडे गेले. त्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीस हॅरिसन स्ट्रिट परिसरात वास्तव्यास असलेल्या एँजेलाच्या घरी पोहोचले. तिथे त्यांना तिच्या प्रियकराचा मृतदेह आढळून आला. 

पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी कुजणाऱ्या मृतदेहाचा दुर्गंध येत होता. पोलिसांनी समोरच्या बाजूनं घरात प्रवेश करताच एँजेलाच्या प्रियकराचा मृतदेह एका खुर्चीत बसलेल्या अवस्थेत आढळला. यावेळी पोलिसांनी चौकशी केल्यावर काही आठवड्यांपूर्वी प्रियकराचं निधन झाल्याचं एँजेलानं सांगितलं. या काळात तिनं प्रियकराचं बँक कार्डदेखील वापरलं. 'तिला त्याच घरात राहायचं होतं. तिला बँक कार्डमुळे काही फायदेदेखील मिळत होते,' अशी माहिती मोनरो पोलीस विभागाच्या कॅप्टन चॅड टोल्सटेल्ड यांनी दिली. प्रियकराचा मृत्यू 1 महिन्यापूर्वी झाला आणि तो नैसर्गिक होता, असंदेखील त्यांनी सांगितलं. एँजेलावर मृत्यूची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तिच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. 
 

Web Title: Michigan Woman Held For Living With Dead Boyfriend For a Month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू