लातूरच्या विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेत पडून; अंत्यसंस्कार नाही, परराष्ट्र खात्याचा ‘वीकेंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:22 AM2017-11-06T03:22:23+5:302017-11-06T03:22:29+5:30

परराष्ट्र मंत्रालय व न्यूयॉर्क दूतावासाच्या अनास्थेमुळे लातूरच्या सुनील बिरादरचा मृतदेह १२ दिवसांनंतरही अमेरिकेत अंत्यसंस्काराविना आहे.

Latur's body falls into America; Not a funeral, Foreign Day's 'Weekend' | लातूरच्या विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेत पडून; अंत्यसंस्कार नाही, परराष्ट्र खात्याचा ‘वीकेंड’

लातूरच्या विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेत पडून; अंत्यसंस्कार नाही, परराष्ट्र खात्याचा ‘वीकेंड’

Next

टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालय व न्यूयॉर्क दूतावासाच्या अनास्थेमुळे लातूरच्या सुनील बिरादरचा मृतदेह १२ दिवसांनंतरही अमेरिकेत अंत्यसंस्काराविना आहे. तो ओहियोतील विद्यापीठात अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेत होता. सुनील २७ आॅक्टोबरपासून बेपत्ता होता. तलावाजवळ त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती १ नोव्हेंबरला विद्यापीठाने त्याच्या नातेवाइकांना दिली.
सुनीलचा मित्र रविशंकर याने परराष्ट्र मंत्रालय, न्यूयॉर्क दूतावासामध्ये संपर्क साधला. सुषमा स्वराज यांना टिष्ट्वट केले. मृतदेह भारतात पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर दूतावासाने तांत्रिक कारण सांगत, नंतर नकार कळविला. दहा दिवसांपासून सुनीलचे कुटुंबीय परराष्ट्र मंत्रालय, दूतावासाच्या संपर्कात आहे. मृतदेह मायदेशी आणण्याऐवजी तेथेच अंत्यसंस्कार करू देण्यास कुटुंबीयांनी होकार कळवल्यानंतर, ‘विकेंड’चे कारण सांगत अधिकाºयांनी अंत्यसंस्कारास पुन्हा विलंब केला. आजही सुनीलचा मृतदेह अंत्यसंस्काराविनाच आहे.
मूळ उद्गीरचा असलेल्या सुनीलने पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले होते. त्याच्या संशयास्पद मृत्यूमागे घातपाताची शक्यता कुटुंबीयांनी वर्तविली होती. त्याच्या मृत्यूची माहिती दिल्यावर दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाने केवळ ई-मेल्सचे घोडे नाचविले.
सुनीलचे नातेवाईक रविशंकर शीवशिवे म्हणाले की, मेल्सना उत्तर मिळाले, परंतु अंत्यसंस्कारासाठी तत्परता दाखविली नाही.

Web Title: Latur's body falls into America; Not a funeral, Foreign Day's 'Weekend'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.