'नरभक्षी' जोडपं, 18 वर्षात 30 पेक्षा अधिक लोकांना खाल्लं, फ्रिजमध्ये मानवी मांसाचं लोणचंही ठेवलं होतं साठवून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 03:18 PM2017-09-26T15:18:14+5:302017-09-26T15:23:36+5:30

मानवाला मारुन खाणरे 'नरभक्षी' तूम्ही  राँग टर्न आणि हॉस्टेलसारख्या हॉलिवूड चित्रपटामध्ये पाहिलं असेल. प्रत्येक्षात असे कधी घडेल असा विचार तूम्ही कधी केला का? पण रशियामध्ये अशी धक्कादायक घटना घडली आहे.

'Kambhakshi' couple, consumed more than 30 people in 18 years, also kept a lot of human flesh in the fridge. | 'नरभक्षी' जोडपं, 18 वर्षात 30 पेक्षा अधिक लोकांना खाल्लं, फ्रिजमध्ये मानवी मांसाचं लोणचंही ठेवलं होतं साठवून

'नरभक्षी' जोडपं, 18 वर्षात 30 पेक्षा अधिक लोकांना खाल्लं, फ्रिजमध्ये मानवी मांसाचं लोणचंही ठेवलं होतं साठवून

Next
ठळक मुद्देआरोपी युवक आणि त्याची पत्नी मिलिटरी अॅकॅडमीत काम करत होतीमोबाईलमध्ये बाकेशेवचे मृतदेहासोबत फोटो होते35 वर्षीय दिमित्री बाकेशेवने 1999 पासून हा प्रकार सुरू असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.

मॉस्को - मानवाला मारुन खाणरं 'नरभक्षी' तूम्ही  राँग टर्न आणि हॉस्टेलसारख्या हॉलिवूड चित्रपटामध्ये पाहिलं असेल. प्रत्येक्षात असे कधी घडेल असा विचार तूम्ही कधी केला का? पण रशियामध्ये अशी धक्कादायक घटना घडली आहे. एका नरभक्षी जोडप्यान 18 वर्षामध्ये 30 पेक्षा आधिक जणांना मारुन खालं आहे. मानवांपासून त्यांनी लोणचही तयार केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. रशियाच्या पोलिसांनी या जोडप्यांना अटक केली आहे.  या नरभक्षी जोडप्यानी आपला गुन्हा कबुलही केला आहे. पोलिसांना त्यांच्या घरातून 8 मानवांच्या शरीराचे भाग मिळाले आहेत. धक्कादायक म्हणजे, हे नरभक्षी जोडपं लोकांना मारत असे आणि त्यानंतर मृत शरीरासोबत सेल्फीही घेत असल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाले आहे. स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहे. 

रशियाच्या दक्षिण भागात राहणाऱ्या 35 वर्षीय दिमित्री बाकेशेवने 1999 पासून हा प्रकार सुरू असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. बाकेशेवसोबतच त्याची पेशाने वकील असलेली पत्नी नतालियाला ही अटक करण्यात आली आहे.  स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, रशियन इन्वेस्टिगेशन कमिटीने म्हटले आहे की बाकेशेव आणि त्याची पत्नी मानवी मृतदेह फ्रिज आणि तळघरात साठवून ठेवत असतं. या दोघांनी मानवी मांसापासून लोणच बनवून ते साठवून ठेवलं होतं असं ही सांगण्यात येत आहे. याशिवाय पोलिसांना 19 मानवी कवट्याही सापडल्या आहेत.


आरोपी युवक आणि त्याची पत्नी मिलिटरी अॅकॅडमीत काम करत होती. क्रास्नोडारमध्ये एक मोबाईल फोन आढळला होता. हा मोबाईल बाकेशेवचा होता. या मोबाईलमध्ये बाकेशेवचे मृतदेहासोबत फोटो होते. त्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास सुरू करून त्याला अटक केली.

बाकेशेवची बायको नतालिया त्याच्यापेक्षा सात वर्षांनी मोठी आहे. मात्र या दोघांनी कधी लग्न केलं हे कळू शकलेलं नाही. हे कुटुंब मिलिटरी अॅकॅडमीच्या वसतिगृहात रहात होते. सध्या त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे लोक गुंगीचे औषध देऊन लोकांना बेशुद्ध करत असतं. नतालिया खूपच संतप्त स्त्री असल्याचं शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.
 

Web Title: 'Kambhakshi' couple, consumed more than 30 people in 18 years, also kept a lot of human flesh in the fridge.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस